भरदिवसा प्लॅटमध्ये शिरुन चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:57 IST2018-06-13T00:57:50+5:302018-06-13T00:57:50+5:30

 In the day-to-day plots, theft | भरदिवसा प्लॅटमध्ये शिरुन चोरी

भरदिवसा प्लॅटमध्ये शिरुन चोरी

नाशिकरोड : दुर्गा उद्यानजवळील कुंदन अपार्टमेंटमध्ये भरदिवसा फ्लॅटमध्ये शिरून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये किमतीचे लॅपटॉप व मोबाइल चोरून नेले. अ‍ॅड. माधव रमेश मालपाणी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सोमवारी सकाळी फ्लॅटचा मुख्य दरवाजा लोटून आंघोळीसाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा ढकललेला दरवाजा उघडून मायक्रोसॉफ्ट सरफ्रेस् प्रो कंपनीचा सात हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व राखाडी रंगाचा ४० हजार रुपये किमतीचा आयफोन सहा असा एकूण एक लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला. भर लोकवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
स्टेट बँकेजवळ घरफोडी
नाशिक : सिडकोतील स्टेट बँक परिसरातील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेल्याचा प्रकार रविवारी (दि़३) सकाळी उघडकीस आला़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँकेजवळील उद्यानासमोरील रहिवासी देवीदास उबाळे हे शनिवारी बाहेर गेले होते. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ चोरट्यांनी घरातील बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख २९ हजार ५२९ रुपयांचे दागिने चोरून नेले़उबाळे रविवारी (दि. ३) दुपारी घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे समोर आले़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  In the day-to-day plots, theft