घोटी परिसरात दत्तजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:53 IST2020-12-29T17:51:30+5:302020-12-29T17:53:27+5:30

घोटी : शहर व परिसरात दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. दत्त मंदिर, कानिफनाथ मंदीर, श्री स्वामी समर्थ मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

Datta Janmotsav celebrated in Ghoti area with various programs | घोटी परिसरात दत्तजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

घोटी परिसरात दत्तजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

घोटी येथील विविध ठिकाणी गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली. दत्त मंदिरांमध्ये व स्वामी समर्थ मंदिरातही जन्मोत्सवानिमित्त महिला भाविकांनी साजरा केला. मंदिरांमध्ये अभिषेक, पारायण, मूर्तिपूजा आदी विधिवत पूजा करण्यात आल्या, तसेच प्रसादाचेही वाटप व दत्त पोवाडा, भजन सादर करण्यात आले.
घोटी येथील पोलीस स्टेशन, दत्त मंदिर, शनी मंदिर परिसर, दत्त मंदिर दारणा, नदीतीरीची दत्त मंदिरे, तसेच स्वामी समर्थ मंदिर व मुंढेगाव येथील दत्त मंदिरातही असंख्य भाविकांनी दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला. मुंढेगाव येथे दत्तभक्त रघुनाथबाबा किर्वे यांच्या अधिपत्याखाली दत्तजयंती सोहळा साजरा झाला.

Web Title: Datta Janmotsav celebrated in Ghoti area with various programs