शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

दारणाकाठ : चांदगिरी गावाच्या शिवारात पुन्हा बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 3:30 PM

नाशिक : दारणाकाठावरील चांदगिरी गावाच्या शिवारात असलेल्या एका फार्महाऊसच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास एक प्रौढ मादी ...

ठळक मुद्देमानवी हल्ले नर बिबट्याकडून मादी बिबट्यांची लवकरच मुक्तता होण्याची शक्यतादारणाकाठालगत ११ बिबटे जेरबंद

नाशिक : दारणाकाठावरील चांदगिरी गावाच्या शिवारात असलेल्या एका फार्महाऊसच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास एक प्रौढ मादी पिंज-यात जेरबंद झाली. या गावाच्या शिवारात हा दुसरा तर दारणाकाठालगतच्या शिवारात नाशिक पश्चिम विभागाला अकरावा बिबट्या पिंज-यात कैद करण्यास यश आले आहे. यामुळे दारणाकाठावरील भय आता कमी झाले आहे.दारणाकाठालगत हिंगणवेढे, दोनवाडे, बाभळेश्वर गावात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांसह वृध्दाचा बळी गेला. तसेच पळसे, चेहडी, कोटमगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यांत मुले जखमी झाली. यामुळे दारणाकाठ बिबट्याच्या दहशतीखाली सापडला. येथील पंचक्रोशीत नागरिक भयभीत झाले होते. वनमंत्र्यांकडून याबाबत वनखात्याला सुचना करत मानवी जीवीतास धोकादायक ठरणा-या बिबट्या जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि वनविभागाने युध्दपातळीवर मोहीम हाती घेत ३५ ट्रॅप कॅमेरे आणि २० पिंजरे लावण्यात आले. २ जुलैपासून अद्यापपर्यंत दारणाकाठालगतच्या गावांमधून सुमारे ११ बिबटे जेरबंद केले गेले आहे. ३०जुलै रोजी चांदगिरी शिवारात दीड वर्षाचा नर पिंजºयात अडकला होता. जेरबंद झालेल्या एकूण ११ बिबट्यांमध्ये ५ नर आणि ७ माद्यांचा समावेश आहे. सिन्नर परिक्षेत्रांतर्गत चिंचोली गावात एक नर व मादी कैद झाली होती. यापैकी सहा बिबट्यांचा मुक्काम बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात आहे.दारणाकाठालगत झालेल्या मानवी हल्ले नर बिबट्याकडून झाल्याचा निर्वाळा हैदराबादच्या सीसीएमबी प्रयोगशाळेकडून देण्यात आला आहे. यामुळे जेरबंद करण्यात आलेल्या मादी बिबट्यांची लवकरच मुक्तता होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत नाशिक पश्चिम वनविभागाकडून पत्रव्यवहार केला जात आहे; मात्र या विभागाच्या उपवनसंरक्षकांची औरंगाबाद येथे पदोन्नतीने बदली झाल्यामुळे कदाचित मादी बिबट्यांच्या सुटकेचा प्रस्ताव रखडण्याची चिन्हे आहेत. कारण अद्याप पश्चिम वनविभागासाठी नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवleopardबिबट्या