दरोड्याच्या तयारीतील संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST2018-12-25T23:53:52+5:302018-12-26T00:22:09+5:30
गंगाघाटावर देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या लक्झरी बसवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाºया पाच जणांच्या सशस्त्र टोळीतील दोघा संशयितांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़

दरोड्याच्या तयारीतील संशयितांना अटक
पंचवटी : गंगाघाटावर देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या लक्झरी बसवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाºया पाच जणांच्या सशस्त्र टोळीतील दोघा संशयितांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़ या दोघांकडून धारदार शस्त्रास्त्रे मिरचीची पूड, नायलॉन दोरी असे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून, अंधाराचा फायदा घेऊन तिघे संशयित पसार झाले आहेत़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर हे पोलीस कर्मचाºयांसोबत रामकुंड परिसरात गस्त घालत होते़ त्यांना गणेशवाडी भाजीमंडई पायºयांवर ४ ते ५ संशयित शस्त्रास्त्र घेऊन लक्झरी बसवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार विलास बस्ते, बाळनाथ ठाकूर, संतोष काकड संदीप शेळके, सुरेश नरवडे, सतीश वसावे, सचिन म्हसदे, अरुण गायकवाड, मोतीराम चव्हाण, दशरथ निंबाळकर, जितू जाधव, उत्तम खरपडे, महेश साळुंके, भूषण रायते यांनी सापळा रचून टोळीतील दोघा संशयितांना ताब्यात घेतले़ या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्र, दरोड्याचे साहित्य आढळून आले़ पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही संशयित सराईत गुन्हेगार असून, अंधाराचा फायदा घेत त्यांचे तिघे साथीदार पसार झाले आहेत़