महापालिकेचे पुर्व विभाग कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:48 IST2019-07-29T14:33:52+5:302019-07-29T14:48:51+5:30
महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपुर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तूला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरूवातीला हे मुख्यालय होते.

महापालिकेचे पुर्व विभाग कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला
नाशिक : जुनी महापालिका इमारत तसेच सध्याचे पुर्व विभागाचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीचा धोकादायक झालेला भाग पावसामुळे अखेर आज सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला. इमारतीच्या दर्शनी भागाला दगडी भींतीला तडे गेल्याने हा भाग धोकादायक झाला होता. दुपारी उंचावरून काही दगड खाली कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. भींतीला थेट वरून खालपर्यंत मोठा तडा गेला असून तो भाग कधीही ढासळू शकतो. या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे. घटनास्थळी पोलीस, महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे.
महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपुर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तूला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरूवातीला हे मुख्यालय होते. त्यानंतर पुर्व विभागाचे कार्यालय अशी नवी ओळख या दगडी इमारतीला मिळाली. इमारतीच्या देखभालदुरूस्तीबाबत प्रशासनाने कधीही लक्ष पुरविणे गरजेचे समजले नाही. दगडी इमारतीत पक्ष्यांच्या विष्ठेतून रोपे उगवून त्यांची वाढदेखील चांगलीच झाली; मात्र ती रोपे काढण्याबाबतही महापालिकेने कधी पुढाकार घेतला नाही. वर्षानुवर्षांपासून या इमारतीची दुरवस्था वाढीस लागत आहे. चुनखडीदेखील काही ठिकाणाची निघून गेली आहे. भींतीला मोठा तडा गेलेला असताना तो भाग आज दुपारच्या सुमारास कोसळला. या इमारतीला लागून विक्रेत्यांची दुकाने आहेत