देवळा तालुक्यातील वाजगावला भिंत कोसळून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 17:42 IST2019-07-22T17:41:55+5:302019-07-22T17:42:08+5:30

सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही

Damaged wall collapse damage | देवळा तालुक्यातील वाजगावला भिंत कोसळून नुकसान

देवळा तालुक्यातील वाजगावला भिंत कोसळून नुकसान

ठळक मुद्दे३० हजार रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे शनिवारी (दि.२०) रात्री पावसामुळे घराची भिंत कोसळून सुमारे३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी रात्री एक वाजता हि घटना घडली. वाजगाव येथील बसस्थानकालगत गावठाण हद्दीतील कौतिक रामभाऊ खैरनार यांच्या घराची भिंत कोसळली. यामुळे मोठा आवाज झाला. आवाज ऐकूण गावातील ग्रामस्थ धाऊन आले व त्यांनी मदतकार्य सुरू केले. त्यावेळी पाऊस सुरू होता. घरात पती कौतिक व पत्नी सौ.प्रमिला हे दोघेच होते. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. तलाठी नरवडे यांनी घटनेचा पंचनामा केला असून ३० हजार रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Damaged wall collapse damage