अवकाळी पावसाने ११७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 01:44 AM2022-03-10T01:44:17+5:302022-03-10T01:44:40+5:30

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने ११७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर पाच जनावरे दगावले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मनमाड येथे एका घराची पडझड झाली. दिवसभरात ३९.०७ मिमी. पावसाची नोंद झाली असून गुरुवारी देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांना चांगलाच फटका बसला. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे ६६ गावांमधील १९९२ शेतकरी बाधित झाले तर भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.

Damage to crops on 1176 hectares due to untimely rains | अवकाळी पावसाने ११७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अवकाळी पावसाने ११७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने ११७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर पाच जनावरे दगावले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मनमाड येथे एका घराची पडझड झाली. दिवसभरात ३९.०७ मिमी. पावसाची नोंद झाली असून गुरुवारी देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांना चांगलाच फटका बसला. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे ६६ गावांमधील १९९२ शेतकरी बाधित झाले तर भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे ११.२० हेक्टरवरील गहू पिकाला फटका बसला आहे तर १.२० हेक्टरवरील भाजीपाला आणि इतर पिके देखील पाण्यात गेली. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव महागण्याची शक्यता आहे.

मध्यरात्री झालेला जोरदार पाऊस आणि पहाटे बरसलेल्या अवकाळी पावसाने फळपिकांचा चांगलाच फटका बसला. गहू आणि द्राक्ष पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ७१४.२० हेक्टरवरील द्राक्ष पिकांना या पावसाचा फटका बसल्याने द्राक्ष पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सुमारे ३१८ हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक फटका सटाणा आणि सिन्नर तालुक्यात झाले आहे. सटाणा येथे १४० तर निफाडला १५ तर सिन्नर तालुक्यात २४३ हेक्टरवरील कांद्याचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.

नाशिक, निफाड, सिन्नर तसे सटाणा येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष पिकाला फटका बसला. निफाड तालुक्यात सर्वाधिक १४०१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर सटाणा तालुक्यात २४६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला. सिन्र तसेच काही प्रमाणात नाशिकमधील शेतकरीही बाधित झाले. प्रशासनाने या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केला असून नुकसानीचा अंतिम अहवालही शासनाला लवकरच सादर केला जाणार आहे. दरम्यान, गेल्या देान दिवसात जनावरे दगावल्याची संख्या ११ इतकी झाली आहे.

इन्फो--

अवकाळी पाऊस असा

तालुका पाऊस मिमी

नाशिक            ०.०५

दिंडोरी             ०.००

इगतपुरी            ८.००

पेठ             ०००

त्र्यंबकेश्वर ०००

निफाड             ६.००

येवला             ८.००

सिन्नर             ४.००

मालेगाव ०.००

चांदवड            ०.००

नांदगाव             ६.००

कळवण             ०.००

सुरगाणा             ०.००

बागलाण             ७.०२

देवळा             ०.००

एकूण             ३९.००

Web Title: Damage to crops on 1176 hectares due to untimely rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.