दीड एकर द्राक्षबागकोसळल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:36 IST2019-03-15T17:36:38+5:302019-03-15T17:36:51+5:30
वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील महिला शेतकरी लताबाई सुभाष दवंगे यांच्या शेतामधील परिपक्व अवस्थेत असलेल्या क्षेत्रातील दीड एकर द्राक्षबाग बुधवार दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास अचानक कोसळल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.

दीड एकर द्राक्षबागकोसळल्याने नुकसान
वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील महिला शेतकरी लताबाई सुभाष दवंगे यांच्या शेतामधील परिपक्व अवस्थेत असलेल्या क्षेत्रातील दीड एकर द्राक्षबाग बुधवार दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास अचानक कोसळल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.
बँकेचे लाखोंचे कर्ज घेऊन उभी केलेली द्राक्षबागेला औषधे, मजुरी तसेच खतांचा खर्च करून पोरा सारखे जीव लावलेली द्राक्षबाग डोळ्यादेखत जमीनदोस्त झाला. अवघ्या दहा दिवसांत विक्र ीसाठी तयार असलेली द्राक्षबाग दुपारच्या सुमारास आलेल्या वादळात पडल्याने २००/२५० किंवटल मालाचे नुकसान झाले आहे. यात पाच, सहा लाखांवर आर्थिक हानी झाली आहे. आधीच शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना अवकाळी पाऊस, बदलते हवामानाचा द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे द्राक्षबागाना कवडीमोल बाजारभाव मिळत असून उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या दवंगे कुटुंबावर नैसिर्गक आपत्ती आल्याने शासनाने त्वरीत पंचनामा करु न नुकसान भरपाई द्यावी अशी अशी मागणी करण्यात आली आहे.