शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

दादा भुसे यांची हॅट्ट्रिक

By admin | Updated: October 20, 2014 00:11 IST

दादा भुसे यांची हॅट्ट्रिक

 

मालेगाव : मालेगाव बाह्य येथील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दादा भुसे यांनी विजयाची हॅट्ट्रिक करत तिसऱ्यांदा विजयी पताका फडकावली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे पवन ठाकरे यांना ३७ हजार ४२१ मतांनी पराभूत केले. दादा भुसे यांना ८२ हजार ९३, तर पवन ठाकरे यांना ४४ हजार ६७२ मते मिळाली. येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजेला मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत भुसे यांना ४११६ मते, तर ठाकरे यांना २००१ मते मिळाली. यात त्यांनी घेतलेली आघाडी २११५ मतांची घेतली होती. अखेरच्या फेरीपर्यंत आघाडी वाढत गेली. भुसे यांनी प्रत्येक फेरीत इतर उमेदवारांपेक्षा पाचशे ते २००० मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली. मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार ठाकरे यांनी मताधिक्य कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश मिळाले नाही. भुसे यांचे मताधिक्य वाढत असतानाच इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी हळूहळू मतमोजणी परिसरातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडे शिवसैनिकांची व भुसे समर्थकांची गर्दी वाढू लागली होती. त्यांनी गुलाल उधळत घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यात आमदार दादा भुसे आल्यानंतर त्यात प्रचंड भर पडली. यावेळी त्यांच्याबरोबर तालुकाध्यक्ष संजय दुसाने, शहराध्यक्ष रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, बंडू बच्छाव, नंदकिशोर मोरे, जतीन कापडणीस, भरत देवरे, सुनील देवरे आदि उपस्थित होते. या मतदारासंघात ८१ हजार ३२ महिलांनी, तर ९९ हजार ३२ पुरुष अशा एकूण एक लक्ष ८० हजार ६४ एवढे मतदान झाले असून, मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीसाठी पर्यवेक्षक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक, शिपाई प्रत्येकी १४ कर्मचारी, तर पोस्टल मते मोजण्यासाठी ४ कर्मचारी असे एकूण ६० कर्मचारी नेमण्यात आले होते. यावेळी मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. मतमोजणीसाठी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पुरुष व महिला कर्मचारी, राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय पोलीस दल यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सर्वांची तपासणी करून मतमोजणी केंद्रात सोडण्यात येत होते. मतमोजणी केंद्रात दूरभाष नेण्यास बंदी करण्यात आली होती.