शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला डॉक्टरच्या घरावर दरोडा

By admin | Updated: August 18, 2015 23:53 IST

डॉक्टर पत्नीवर कोयत्याने हल्ला : सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

सातपूर : येथील भरवस्तीत असलेल्या एका डॉक्टरच्या घरावर चौघा दरोडेखोरांनी दरोडा टाकून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि़१७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली़ दरोडेखोरांना डॉक्टर दाम्पत्याने हटकले असता त्यातील एक जण डॉक्टर पत्नीवर कोयत्याने हल्ला करून पलायनाच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ त्यास न्यायालयात हजर केले असता २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सातपूर कॉलनीतील मौले हॉलजवळील संदीपनगरमध्ये डॉ़सुदाम दौलत चौधरी हे कुटुंबासह राहतात़ श्रावणी सोमवार असल्याने त्यांची पत्नी सुलभा चौधरी या मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या़ डॉ़चौधरी यांनी दवाखान्यातील कामकाज आटोपून ते पत्नी व मुलीला घेण्यासाठी मंदिरात गेले़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हे तिघे घरी परतले असता घरातील लाईट सुरू, दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला आढळून आला़डॉक्टरांच्या घराबाहेर आवाज आल्याने यातील दरोडेखोर एकेक करत घराबाहेर पडत असताना एकास डॉक्टर चौधरी यांनी पकडले, मात्र तो पळून गेला़ मात्र दुसऱ्यास सुलभा चौधरी यांनी घट्ट पकडून ठेवले असता पळून गेलेला एक जण माघारी आला व त्याने डॉक्टरांवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला़ मात्र सुलभा यांनी हा वार हातावर झेलल्याने डॉक्टर थोडक्यात बचावले़ या गोंधळामुळे शेजारील नागरिक मदतीला धावले व त्यांनी पलायनाच्या प्रयत्नात असलेला दरोडेखोर विकास सुरेश जाधव (वय २१, रा़जाधव संकुल) यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़डॉक्टरांच्या घरातून पळून गेलेल्या दरोडेखोरांनी २२ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख २७ हजार रुपये लुटून नेले़ या प्रकरणी डॉ़ सुदाम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, विकास जाधव यास अटक केली आहे़ उर्वरित संशयित अक्षय भारती, दत्तू दंडगव्हाण, शरद पाटील हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत़ (वार्ताहर)