सायकलपटू महिलेचा दुचाकीस्वाराकडून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 01:12 IST2020-12-28T01:10:58+5:302020-12-28T01:12:04+5:30
सकाळच्या सुमारास सायकलवरून फेरफटका मारणाऱ्या एका महिलेसोबत वडाळा गावातील एका दुचाकीस्वार तरुणाने अश्लील वर्तन करत हाताने पाठीवर चापट मारत विनयभंग केल्याची घटना सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

सायकलपटू महिलेचा दुचाकीस्वाराकडून विनयभंग
सिडको : सकाळच्या सुमारास सायकलवरून फेरफटका मारणाऱ्या एका महिलेसोबत वडाळा गावातील एका दुचाकीस्वार तरुणाने अश्लील वर्तन करत हाताने पाठीवर चापट मारत विनयभंग केल्याची घटना सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयित दुचाकीस्वार शाहीद गुलाम दस्तगीर तडवी (२३) यास अंबड पोलिसांनी शिताफीने अटक केली
आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला इंदिरानगर बोगद्यापासून मैत्रिणीसोबत सकाळच्या सुमारास गोविंदनगर रस्त्यावरून पुढे सायकलिंग करीत होती. यावेळी पाठीमागून दुचाकीने वेगात आलेल्या संशयित शाहीद याने त्या पीडित सायकलपटू महिलेच्या कमरेवर हाताच्या चापटीने मारून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी शाहीदविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्यास बेड्या ठोकल्या.