त्र्यंबकेश्वरला सुट्यांमुळे भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 17:08 IST2021-01-10T17:08:02+5:302021-01-10T17:08:27+5:30
त्र्यंबकेश्वर : शनिवार व रविवारच्या दोन सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. येत्या ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन असताना भाविक कोविडची भीती न बाळगता दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने हजेरी लावू लागले आहेत.

त्र्यंबकेश्वरला सुट्यांमुळे भाविकांची गर्दी
मंदिरात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत देवस्थान भाविकांची पूर्ण काळजी घेत आहे. फक्त बाहेरच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. लोकांच्या चेहऱ्यावर मास्क असतो; पण फक्त कानाला अडकवलेला असतो. नाक व तोंड मोकळेच असते तर कधी फक्त तोंडावर मास्क सरकवला जातो. नाक मोकळेच असते. दरम्यान, दि. १६ नोव्हेंबर रोजी मंदिर उघडल्यापासून दर आठवड्यात सुटीचे दिवस व शुक्रवार शनिवार, रविवार व सोमवारी गर्दी असते.