शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

NCPचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात गर्दी, अजितदादा, भुजबळांसमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 22:51 IST

Nashik News : कोरोनाच्या संसर्गाचा धोका अद्याप कमी झाला नसल्याने विवाह सोहळे, तसेच इतर कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नाशिक - कोरोनाच्या संसर्गाचा धोका अद्याप कमी झाला नसल्याने विवाह सोहळे, तसेच इतर कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात आली आहे. मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाच या नियमांचा विसर पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्याला कार्यकर्ते आणि वऱ्हाड्यांची मोठी झाली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाले.या विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. दिलीप बनकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाड मतदारसंघातील आमदार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला वऱ्हाड्यांसह राज्य सरकारमधील मंत्री, आमदार तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक शहरातील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला.दरम्यान, या विवाह सोहळ्यात झालेल्या सोशल डिस्टंसिंगच्या उल्लंघनावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. ज्यांनी कायद्याचे पालन करायचे असते त्यांनीच कायद्याचे उल्लंघन केले तर सर्वसामान्यांनी कायद्याचे  पालन करताना कोणाचा आदर्श ठेवायचा असा सवाल, दरेकर यांनी उपस्थित केला.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा विवाह पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये झाला होता. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने टीका झाली होती. या लग्नाला पाहुण्यांची अलोट गर्दी झाली होती. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. सामान्यांसाठी लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना व नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना आमदारांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येत होता.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नNashikनाशिक