शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २०० आंदोलकांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: October 11, 2016 01:11 IST

शहरातील २०० आंदोलकांवर गुन्हे दाखल

नाशिक : तळेगाव येथील अत्याचारप्रकरणी रविवारी (दि़९) शहरात आंदोलने होऊन काही ठिकाणी वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळही करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस आयुक्तालयातील आडगाव, अंबड, सातपूर, इंदिरानगर, देवळाली कॅम्प यांसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे २०० आदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ पाथर्डी फाटा येथील शिवाजी पुतळ्यासमोरील आंदोलनास हिंसक वळण लागले. या ठिकाणी काही आंदोलक हे रस्त्यावरील वाहनांना अडवून घोषणाबाजी करीत होते़ या आंदोलनकांना पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे हे समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली़ यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे जखमी झाले़ याप्रकरणी पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच दगडफेकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये पाथर्डी फाटा, पिंपळगाव खांब, राणेनगर, दाढेगाव, चेतनानगर, मोरवाडी येथील आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे.
नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस (एमएच २०, ८६५४) आंदोलनकर्त्यांनी प्रतीक्षा हॉटेलसमोर अडवून घोषणा देत गाडीच्या काचा फोडल्या. तसेच गाडीचे सीटही पेटवून दिले. याप्रकरणी अज्ञात आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी फाटा येथे दुपारी ३.४५च्या सुमारास निमाणी ते अंबड (एमएच ४०, ४५५६) ही शहर बस अडवून दगडफेक केली. त्यामध्ये बसचालक संजीव कदम जखमी झाल़े याप्रकरणी कदम यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात १२ आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प परिसरात दुपारी ५ वाजेच्या सुमारास शिवडे ते भगूर (एमएच १५ एके ८०६४) या बसवर विजयनगर बस स्टॉपजवळ आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या़ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सुमारे २० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास महात्मानगर येथील सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले़ या प्रकरणी संत कबीरनगर येथील सहा युवकांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ दरम्यान, सोमवारी (दि़१०) पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलनकर्त्यांची ओळख पटवून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)