झाडावर फलक लावल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 01:15 IST2019-03-22T01:14:27+5:302019-03-22T01:15:11+5:30

आडगाव परिसरात झाडावर जाहिरातबाजीच्या उद्देशाने फलक लावल्याप्रकरणी एका व्यावसायिकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Criminal case related to planting | झाडावर फलक लावल्याप्रकरणी गुन्हा

झाडावर फलक लावल्याप्रकरणी गुन्हा

पंचवटी : आडगाव परिसरात झाडावर जाहिरातबाजीच्या उद्देशाने फलक लावल्याप्रकरणी एका व्यावसायिकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग परिसरातील आशीर्वाद को-आॅप. हौसिंग सोसायटीलगत असलेल्या झाडांवर विनापरवाना जाहिरात फलक लावून नियमांची पायमल्ली करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियमान्वये आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापालिका कर्मचारी वसंत धुमसे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. येथील वृक्षांवर संघर्ष करिअर अकादमी, पेस्ट कंट्रोल आणि हिरा करियर पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण आदी व्यावसायिकांकडून विनापरवाना जाहिरात फलक लावण्यात आले होते. पंचवटी विभागीय कार्यालयातील वसंत रघुनाथ ठुमसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Criminal case related to planting