धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून एका महिन्याच्या बाळाला सोडून विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:31 IST2022-01-13T18:30:32+5:302022-01-13T18:31:51+5:30

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मोनाली मयुर सोनवणे (२३) हिने सासरच्या मानसिक व शारीरिक छळवणुकीस कंटाळून अवघ्या एका ...

Crime News Fed up with her father-in-law's harassment woman committed suicide | धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून एका महिन्याच्या बाळाला सोडून विवाहितेची आत्महत्या

धक्कादायक! सासरच्या छळाला कंटाळून एका महिन्याच्या बाळाला सोडून विवाहितेची आत्महत्या

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मोनाली मयुर सोनवणे (२३) हिने सासरच्या मानसिक व शारीरिक छळवणुकीस कंटाळून अवघ्या एका महिन्याच्या तान्हुल्या बाळास मागे ठेवून विहिरीत उडी मारत जीवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पती मयुर सोनवणे यास अटक करून अभोणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

भरवीर (ता. इगतपुरी) येथील सासर असलेल्या मोनाली सोनवणे या प्रसुतीसाठी माहेरी प्रभाकर गायकवाड (रा. कनाशी) येथे आलेल्या होत्या. त्यांना पुत्ररत्न झाले होते. सव्वा महिना पूर्ण झाल्याने दि. १२ जानेवारी रोजी मोनाली सासरी देखील जाणार होती. परंतु मंगळवारी ११ रोजी एक वाजता पती मयुर सोनवणे याने फोन केल्यावर मोनाली घराबाहेर गेली होती. सकाळी कनाशी शिवारातील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कैलास गायकवाड यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईर, हवालदार पवार करीत आहेत. (१२ मोनाली सोनवणे)

 

Web Title: Crime News Fed up with her father-in-law's harassment woman committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.