शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

मुंब्रामधील गुन्हेगाराला वडाळ्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:37 AM

मुंब्रा पोलिसांना विविध गंभीर गुन्ह्यांत हवा असलेला सराईत गुन्हेगार इरफान शमशुद्दीन शेख (४२) यास वडाळागावातील सादिकनगर भागातून इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

इंदिरानगर : मुंब्रा पोलिसांना विविध गंभीर गुन्ह्यांत हवा असलेला सराईत गुन्हेगार इरफान शमशुद्दीन शेख (४२) यास वडाळागावातील सादिकनगर भागातून इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच येथील झिनतनगरमधून तडीपार बुºहान शाकीर शेख (२५) या गुन्हेगाराच्याही मुसक्या आवळण्यास पोलिसांना आॅल आउट आॅपरेशनदरम्यान यश आले. बुºहान याने पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न करत घरात जाऊन लपण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचा प्रयत्न फसला.शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीत सतर्क राहून वेळोवेळी मिशन आॅल आउट राबविण्याचे आदेश दिले आहे. यानुसार पोलिसांनी गुरुवारी (दि.१८) रात्री ११ ते मध्यरात्रीपर्यंत वडाळागाव परिसरात मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक आबा पाटील यांच्या पथकाने परिसर पिंजून काढत गावात गुन्हेगारांचा शोध घेतला. दरम्यान, येथील सादिकनगर भागातून पोलिसांना मुंब्रा येथील सराईत गुन्हेगार इरफान हाती लागला. तसेच झीनतनगर भागात पोलिसांनी मोर्चा वळविला असता तेथे एका रिक्षामध्ये तडीपार बुºहान बसलेला आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने रिक्षातून पळ काढत घर गाठले. पोलिसांनी घरातून त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिनाइल पिण्याचे ढोंग के ले; मात्र पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून थेट जिल्हा रुग्णालयात हलविले. त्या ठिकाणी त्यांनी औषध उपचार करण्यास नकार देत डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देत धिंगाणा घालत रुग्णालयातून पळ काढला असता गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या रुग्णालयाच्या आवारात पुन्हा मुसक्या आवळल्या.७८ वाहनांची तपासणीइंदिरानगर पोलिसांच्या वतीने परिसरातील पाथर्डीफाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित ७८ वाहनांची कसून तपासणी पोलिसांनी केली. दरम्यान, विनाकागदपत्रे वाहतूक करणाºया १८ वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच राणेनगर चौफुलीवरदेखील नाकाबंदीदरम्यान, ३७ वाहने तपासण्यात आली. यावेळी पाच वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी