विनयभंगाचा गुन्हा; वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:03 IST2018-11-13T01:03:34+5:302018-11-13T01:03:57+5:30
पळसे दारणा संकुल रो-हाउस येथे अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित वयोवृध्दाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

विनयभंगाचा गुन्हा; वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिकरोड : पळसे दारणा संकुल रो-हाउस येथे अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित वयोवृध्दाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या ठिकाणी राहणारे खंडू मुरलीधर खुºहे (७०) यांच्यावर गतिमंद मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित खुºहे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयित वयोवृद्ध खंडू मुरलीधर खुºहे यांनी सोमवारी दुपारी १२ वाजेच्या पूर्वी राहत्या घरात छताच्या पंख्याच्या हुकला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी दिलेल्या खबरनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.