ब्राम्हणवाडे येथील विवाहितेच्या आत्महत्त्येप्रकरणी दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:48 IST2018-10-31T17:48:35+5:302018-10-31T17:48:49+5:30
सिन्नर : पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. २९) रोजी रात्री घडली. अंजना अभिमन्यू गिते (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

ब्राम्हणवाडे येथील विवाहितेच्या आत्महत्त्येप्रकरणी दोघांवर गुन्हा
सिन्नर : पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. २९) रोजी रात्री घडली. अंजना अभिमन्यू गिते (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हरीभाऊ शंकर जायभाये (रा.जयवंत नगर, ता.भूम, जि. उस्मानाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत अंजनाचा पती संशयित अभिमन्यू भिकाजी गिते व त्याचे अनैतिक संबंधाचा आरोप असलेल्या एका महिलेविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू व संशयित महिला यांच्यात गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही बाब अंजना गिते यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पतीस वारंवार समाजावून सांगितले. मात्र यात कोणतीही सुधारणा झाली नाही. अंजनाच्या समाजावून सांगितल्याचा राग आल्याने अभिमन्यू गिते याने तिला शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच रागातून तसेच अभिमन्यू व संशियत महिला यांच्या जाचास कंटाळून अंजना हिने विषारी औषध प्राशन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिला उपचारार्थ नाशिकरोड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचे निधन झाले. त्यानंतर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.