युवक आत्महत्येप्रकरणी मायलेकींविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:58 IST2019-01-06T19:57:35+5:302019-01-06T19:58:02+5:30
नाशिक : युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आडगाव परिसरातील मायलेकींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आडगाव शिवारातील गजानन पार्कमधील रहिवासी राहुल संजय पाटील (२३) या युवकाने शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती़

युवक आत्महत्येप्रकरणी मायलेकींविरोधात गुन्हा
नाशिक : युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आडगाव परिसरातील मायलेकींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आडगाव शिवारातील गजानन पार्कमधील रहिवासी राहुल संजय पाटील (२३) या युवकाने शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती़
आडगाव पोलीस ठाण्यात राहुलचा भाऊ सागर याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रिहाना आत्तार आणि जास्मीन आत्तार (दोघी रा. प्रणव हाईट्स, श्रीरामनगर, आडगाव शिवार) या मायलेकी राहुलकडे सतत चार लाख रुपयांची मागणी करीत होत्या़ तसेच राहुलवर दबाव टाकून त्यास वारंवार फोन करून बोलावून घेऊन मानसिक त्रास देत होत्या़
या दोघींच्या सततच्या छळास कंटाळूनच भाऊ राहुलने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बिडगर करीत आहेत़