नाशकातील स्वच्छता दुतांचा क्रेडाईतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:05 PM2020-06-07T16:05:37+5:302020-06-07T16:12:03+5:30

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या घंटा गाडी कर्मचारी व खत प्रकल्प येथील कर्मचाऱ्यांचा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सत्कार करण्यात आला.

Credai felicitates the city's sanitation envoys | नाशकातील स्वच्छता दुतांचा क्रेडाईतर्फे सत्कार

नाशकातील स्वच्छता दुतांचा क्रेडाईतर्फे सत्कार

googlenewsNext
ठळक मुद्देक्रेडाईने स्वच्छता दुतांचे मानले आभारनाशिककरांतर्फे घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार

नाशिक : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या घंटा गाडी कर्मचारी व खत प्रकल्प येथील कर्मचाऱ्यांचा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सत्कार करण्यात आला.
नाशिक शहराचे ब्रॅण्डिंग करताना येथील वातावरण, उद्योग, सुविधा याच्या सोबतच स्वच्छता देखील महत्वाची आहे. त्याचमुळे या स्वच्छता दुतांचा सत्कार करून नाशिककरांतर्फे क्रेडाईने आभार मानले. नाशिकमधील विल्होळी येथील खत प्रकल्पामध्ये झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता माळी व सरव्यवस्थापक त्रिपाठी यांनी शहरातून कचरा गोळा करून त्याचे विलगीकरण, प्रक्रिया, खत निर्मिती तसेच त्याचे वितरण याची तसेच संपूर्ण  खत प्रकल्पाची माहिती दिली. याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्र चे सचिव सुनील कोतवाल तसेच क्रेडाई नाशिक मेट्रोचे अनिल आहेर, अतुल शिंदे, राजेंद्र वानखेडे, अंजन भलोदिया, राजेश आहेर, नरेंद्र कुलकर्णी, हितेश पोतदार, सागर शाह व विजय चव्हाणके उपस्थित होते. यावेळी बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेले नाशिक हे शहर सुंदर आहे. या शहराचे सौंदर्य अबाधित राखतानाच शहर अधिक स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ऊन, पाऊस, थंडी याचा विचार न करता आपल्या  शहरातील घंटा गाडी कर्मचारी  झटत असतात.  कोविड -१९ च्या सद्यस्थितीत स्वच्छतेचे महत्व अजूनच वाढले असून या स्वच्छता दुतांचे काम नाशिकसाठी महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 
 

Web Title: Credai felicitates the city's sanitation envoys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.