नाशिक मध्ये लोंढे टोळीचा म्होरक्या आणि रिपाई आठवले गटाचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या बेकायदा बांधकामावर हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:46 IST2025-10-16T12:46:02+5:302025-10-16T12:46:16+5:30
प्रकाश लोंढे हा माजी नगरसेवक असून रिपाई आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष आहे तसेच उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी त्याच्यावर आहे त्याच्यासह भूषण लोंढे आणि दीपक लोंढे या दोन्ही मुलांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नाशिक मध्ये लोंढे टोळीचा म्होरक्या आणि रिपाई आठवले गटाचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढेच्या बेकायदा बांधकामावर हातोडा
नाशिक- शहरातील सातपूर येथील आयटीआय पुलाजवळ असलेल्या माजी नगरसेवक आणि लोंढे टोळीचा म्होरक्या प्रकाश लोंढे यांच्या बेकायदा इमारतीवर नाशिक महापालिकेने आज सकाळी पोलिस बंदोबस्तात हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे .
प्रकाश लोंढे हा माजी नगरसेवक असून रिपाई आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष आहे तसेच उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी त्याच्यावर आहे त्याच्यासह भूषण लोंढे आणि दीपक लोंढे या दोन्ही मुलांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सातपूर मधील एका कॅफेमध्ये केलेल्या गोळीबारा संदर्भात प्रकाश आणि दिपक लोंढे अटकेत असून भूषण लोंढे मात्र फरार आहे सध्या प्रकाश आणि दीपक दोघेही जण पोलीस कोठडीत आहेत यादरम्यान नाशिक महापालिकेने लोंढे यांच्या पुलाजवळील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालवण्याचा निर्णय घेतला होता काल रात्रीपासून येथील कामाला प्रारंभ झाला होता मात्र आज सकाळी सात वाजेपासून खऱ्या अर्थाने अतिक्रमणावर हातोडा चढवण्यात येत आहे या परिसरात प्रचंड बंदोबस्त असला तरी कोणीही विरोध केलेला नाही सुमारे 200 कर्मचारी बांधकाम तोडण्यासाठी उपस्थित आहे.