कार दरीत कोसळून दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 03:07 PM2020-03-19T15:07:33+5:302020-03-19T15:07:41+5:30

सटाणा : रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा कार पंधराशे फुट दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघे जागीच ठार झाले.ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली.

Couple crash into car dies | कार दरीत कोसळून दाम्पत्य ठार

कार दरीत कोसळून दाम्पत्य ठार

Next

सटाणा : रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा कार पंधराशे फुट दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघे जागीच ठार झाले.ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घडली.
मुल्हेर येथील व्यापारी रामजीवन मुरलीधर शर्मा (४८), पत्नी पुष्पा शर्मा (४३) हे बुधवारी रात्रीच्या सुमारास साल्हेर किल्ल्यानजिक असलेल्या हॉटेलवर जेवणासाठी गेले होते .रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास जेवण आटोपून आपल्या तवेरा कारने मुल्हेरकडे परतीच्या मार्गावर असतांना हॉटेलनजीकच त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट पंधराशे फुट दरीत कोसळली .गुजरातमधील डांग जिल्ह्यातील चिंचलीच्या घनदाट जंगलात कारसह दोघे अडकले .घटनेचे वृत्त कळताच मुल्हेर येथील व्यापारी वर्ग तसेच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जंगलात शोध कार्य सुरु केले .यावेळी शर्मा दाम्पत्याचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले.घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली .ही दुर्घटना गुजरातच्या जंगलात घडल्यामुळे तत्काळ गुजरातच्या पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली .आज सकाळी गुजरात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाहणी करण्यात आली .वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाº्यांच्या मदतीने दुपारी उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरु होते . याप्रकरणी अहवा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
--------------------------
हॉटेल नव्हे मृत्यूचा सापळा .........
गेल्या चार वर्षांपासून साल्हेर किल्ल्यालगत असलेल्या गुजरात सीमेवरील डोंगरावर अनिधकृत हॉटेल राजरोस सुरु आहे .गेल्या वर्षी सटाणा येथील युवक देखील दरीत कोसळला होता.मात्र सुदैवाने झाडांमध्ये अडकल्याने तो बचावला .याबाबत पोलीस आणि वन विभागकडे देखील तक्र ारी करण्यात आल्या होत्या. ग्राहकांसाठी ते हॉटेल मृत्यूचा सापळा ठरले आहे.पोलिसांनी अपघात प्रकरणी हॉटेल चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Couple crash into car dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक