नामको बँकेसाठी मतमोजणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 11:39 IST2018-12-26T11:39:30+5:302018-12-26T11:39:53+5:30

सिडको येथील राजे संभाजी स्टेडियम येथे आज सकाळी मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात येत असून त्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे.

Counting of votes for Namako bank | नामको बँकेसाठी मतमोजणी सुरू

नामको बँकेसाठी मतमोजणी सुरू

नाशिक - महाराष्ट्रासह बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. 


सिडको येथील राजे संभाजी स्टेडियम येथे आज सकाळी मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात येत असून त्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत माजी सत्ताधाऱ्यांच प्रगती तसेच विरोधकांचे सहकार तसेच नम्रता या पॅनलमध्ये यंदा चुरशीची लढत झाली. रविवारी झालेल्या मतदानात 1 लाख 76 मतदारांपैकी 63 हजार 839 मतदारांनी मतदान केले आहे. 


आज मतमोजणीसाठी 104 टेबल असून आज 16,500 तसेच 20 हजार आणि 26500 अशा तीन फेऱ्या होतील. तर उर्वरित मतमोजणी उद्या होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी सांगितले. तीन फेऱ्यांत बऱ्यापैकी निकालाचा कल स्पष्ट होईल असा अंदाज आहे.

Web Title: Counting of votes for Namako bank