शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

तंत्रशिक्षण मंडळातर्फे १२ जूनला समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:28 IST

दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे दि. १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ हा लाइव्ह ब्रॉडकास्टिंग मार्गदर्शनपर उपक्रम राबविला जाणार आहे.

नाशिक : दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे दि. १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ हा लाइव्ह ब्रॉडकास्टिंग मार्गदर्शनपर उपक्रम राबविला जाणार आहे.व्यावसायिक शिक्षणातील करिअरचा पर्याय म्हणून अनेक विद्यार्थी दहावी-बारावीनंतर अभियांत्रिकी पदविका पॉलिटेक्निक डिप्लोमा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असला तरी डिप्लोमानंतर लघु उद्योगांसह मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.औद्योगिक क्षेत्रातील संधीकडे अद्यापही विद्यार्थी या क्षेत्राकडे सकारात्मकतेने पाहतात. त्याच्या या सकारात्मकतेला निर्णयात परिवर्तित करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला दिसत असला तरी पदविका मिळविल्यानंतर रोजगाराच्या संधी मात्र उपलब्ध आहेत. नाशिक, औरंगाबादसह राज्यभरातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयांत सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत हा कार्यक्रम लाइव्ह दाखविण्यात येणार असून, यात तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आणि एमसबीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांचे तंत्रशिक्षण क्षेत्रातील संधी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन तंत्रशिक्षण मंडळाचे सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांनी केले आहे. यात दहावी व बारावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासह सर्वच तंत्रनिकेतनमध्ये हा कार्यक्रम दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाविद्यालयांना मार्गदर्शनतंत्रशिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे शुक्रवारी (दि.७) उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या पाचही जिल्ह्यांतील सुमारे १२५ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना डीटीईचे सहायक संचालक प्रा. संजय पगार व प्रा. लक्ष्मीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :NashikनाशिकSSC Resultदहावीचा निकाल