नेऊरगावला कापसाबाबत शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:58 IST2020-07-20T21:23:56+5:302020-07-21T01:58:56+5:30
नेऊरगाव : येथे कापूस पीक शेतीशाळा पार पडली. तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषी पर्यवेक्षक भास्कर नायकवाडी यांनी कापूस पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.

नेऊरगावला कापसाबाबत शेतीशाळा
नेऊरगाव : येथे कापूस पीक शेतीशाळा पार पडली. तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषी पर्यवेक्षक भास्कर नायकवाडी यांनी कापूस पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
मंडल कृषी अधिकारी जे. आर. क्षीरसागर यांनी मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचे एकात्मिक नियंत्रण, तसेच खत व्यवस्थापन व कृषिनिविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी व योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक राहुल जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शेतीशाळेस वजे्रश्वरी कृषी मंडलाचे रामदास बोराडे, विनोद कदम, उद्धव बोराडे, बबन बोराडे, शरद बोराडे, दिनकर कदम, राजू बोराडे, गणपत कदम, धनंजय कदम, गणेश कदम, साईनाथ कदम, शांताराम बोराडे, नानासाहेब कदम, कैलास थोरात, राजेंद्र बोराडे, किरण कदम,
शेखर कदम आदी शेतकरी उपस्थित होते.