शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक आक्रमक

By admin | Updated: July 30, 2016 00:51 IST

सिडको प्रभाग सभा : अधिकाऱ्यांकडून नागरी कामांबात टाळाटाळ

सिडको : अनियमित घंटागाडी, अनधिकृत भाजीबाजाराचा वाढत्या त्रासाबरोबरच सिडको भागात डेंग्यू रुग्णांची वाढलेली संख्या यांसह विविध कामांबाबतच्या तक्रारींचा पाढाच आजच्या प्रभागसभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसमोर मांडत आक्रमक भूमिका घेतली.सिडको प्रभागची सभा प्रभाग सभापती अश्विनी बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी सुमारे दहा लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. प्रभागसभा सुरू होताच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत अधिकारी कामकाजच करीत नसल्याचा आरोप केला. नगरसेवक कल्पना पांडे यांनी सांगितले की, प्रभागात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली असतानाही मनपा प्रशासन सुस्तावलेले दिसत आहे. प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच धूर तसेच औषध फवारणी करण्याबाबत सांगितले, परंतु याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचे आरोपही पांडे यांनी केला. नगरसेवक रत्नमाला राणे यांनीही प्रभागातील नाले साफ होत नसल्याचे सांगत, अधिकारी हे नगरसेवकांनी सांगितलेली कामे करीत नसल्याचेही सांगितले. नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी सांगितले की, प्रभातातील माउली लॉन्स येथे अतिक्रमण करून व्यवसाय करणारे व्यावसायिक आता नागरिकांना दमबाजी करीत आहे. सदरचा भाजीबाजार याठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यासाठी प्रभागात स्वतंत्र जागादेखील अधिकऱ्यांना सुचविली आहे. याबाबत त्वरित निर्णय करण्याची मागणीही मटाले यांनी केली. नगरसेवक शोभा फडोळ यांनीही प्रभागातील नाले साफसफाई होत नसल्याचे सांगत प्रभागात अनियमित घंटागाड्यांमुळे कचऱ्याचे ढीग साचल्याचेही फडोळ यांनी सांगितले. नगरसेवक शोभा निकम यांनीही अधिकारी कामे करीत नसल्याचे सांगितले. नगरसेवक वंदना बिरारी यांनी झाडाचा पालापाचोळा हा उचलला जात नसल्याने रस्त्यांना बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे सांगत प्रभागातील अनेक पथदीप बंद असल्याचेही त्यांनी सांगितले. नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी सांगितले की, अधिकारी हे नागरिकांच्या कामाबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत प्रभागातील नाले अद्यापही साफ करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अनिल मटाले, उत्तम दोंदे, हर्षा बडगुजर, कांचन पाटील आदिंसह विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांसह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)