शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आॅटो डीसीआर विषयावर नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:16 IST

महापालिकेने सिडकोत शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीचे निकष लागू केल्याने त्यावरील लक्षवेधीवर चर्चा केली जात नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत फलक फडकावला, तर सेंट्रल पार्क विकसित करण्याआधी प्रकल्पग्रस्तांना तेथे नोकरीची हमी द्यावी याबाबतच म्हणणे मांडण्यात न आल्याने सेनेच्या महिला नगरसेवकांनी महापौरांविषयी नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजी केली.

नाशिक : महापालिकेने सिडकोत शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीचे निकष लागू केल्याने त्यावरील लक्षवेधीवर चर्चा केली जात नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत फलक फडकावला, तर सेंट्रल पार्क विकसित करण्याआधी प्रकल्पग्रस्तांना तेथे नोकरीची हमी द्यावी याबाबतच म्हणणे मांडण्यात न आल्याने सेनेच्या महिला नगरसेवकांनी महापौरांविषयी नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजी केली. महापालिकेच्या महासभेत प्रथमच विविध विकासकामांना कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने मंजुरी देण्यात आली.महापालिकेची मासिक महासभा बुधवारी (दि.१९) पार पडली. यावेळी दिलीप दातीर यांनी सिडकोतील विकासकामांबाबत लक्षवेधी दिली होती. अशीच लक्षवेधी सभागृह नेता दिनकर पाटील यांनीही दिली होती. त्यावर चर्चा करण्यास महापौर रंजना भानसी यांनी नकार दिला आणि या विषयावर आयुक्तांकडून तोडगा काढून देऊ, अशी भूमिका घेतली. सिडकोतील क्षेत्राला यापूर्वी वेगळी विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली असताना आता नाशिक शहराची नियमावली लागू करून त्यातच आॅटो डीसीआरमध्ये प्रकरण दाखल करण्याची सक्ती करण्यात आल्याने या विषयावर आयुक्तांच्या दालनात सिडकोतील सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल, असे महापौरांनी सांगितल्यानंतर दिलीप दातीर आक्रमक झाले शिवाय शिवसेनेचे नगरसेवकही आक्रमक झाले. त्यांनी उभे राहून दातीर यांना बोलू देण्याची मागणी करतानाच शहराचे नियम सिडकोवर लादू नका, अशा आशयाचे फलक फडकावले आणि स्वत: दातीर यांनीदेखील मागण्यांचा पोशाख परिधान केला. दिनकर पाटील यांनी आपण यासंदर्भातील विषय अगोदरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला असल्याचे सांगून केवळ दातीर यांनाच बोलण्यास सांगितले. त्यानंतर दातीर यांनी सिडकोवासीयांवर होत असलेल्या अन्यायाची कायदेशीर माहिती दिली.दरम्यान, महासभेतील सर्व विकासकामांचे विषय महापौर रंजना भानसी यांनी मंजूर केले आणि सभेचे कामकाज संपवित असताना पेलिकन पार्कच्या जागी सेंट्रल पार्क साकारण्याच्या विषयाला मंजुरी दिली जात असताना सिडकोतील शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी आक्रमक होत आम्हाला बोलू द्या, मोरवाडीतील प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या अन्यथा सभात्याग करू, असा इशारा दिला. परंतु महापौरांनी राष्टÑगीत सुरू करून कामकाज संपवले त्यामुळे नाराज महिला नगरसेवकांनी सभागृहाबाहेर फलक फडकावून घोषणाबाजी केली.पेलिकन पार्कच्या जागी होणाऱ्या सेंट्रल पार्कमध्ये मोरवाडीतील प्रकल्पग्रस्तांना रोजगार द्यावा अन्यथा सेंट्रल पार्क होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी किरण गामणे, सुवर्णा मटाले, हर्षाताई बडगुजर, नयना गांगुर्डे कल्पना पांडे, नयना गांगर्डे, सीमा निगळ, अलका अहिरे, दीपक दातीर यांचा यावेळी समावेश होता.कुष्ठपीडितांना पुन्हा अनुदान सुरू होणारपंचवटीतील कुष्ठरुग्णांना महापालिकेच्या वतीने प्रतिमहिना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येत होते, परंतु ते बंद करण्यात आल्याने भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी महासभेत आक्रमक भूमिका घेतली. कुष्ठपीडितांना माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या काळात हे अनुदान सुरू करण्यात आले होते. परंतु आता बंद झाल्याने कुष्ठपीडितांवर भीक मागण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, परंतु अंदाजपत्रकात त्याचा समावेश आता करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी आयुक्त तसेच लेखाधिकारी आणि मुख्यत्वे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड दोषी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. आयुक्त गमे यांनी यासंदर्भात माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असले तरी महापौरांनी शासकीय सेवेतून प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉ. राहुल गायकवाड यांचा महापालिकेतील कार्यकाल संपल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.महासभेतील सर्व विकासकामांचे विषय महापौर रंजना भानसी यांनी मंजूर केले आणि सभेचे कामकाज संपवित असताना पेलिकन पार्कच्या जागी सेंट्रल पार्क साकारण्याच्या विषयाला मंजुरी दिली जात असताना सिडकोतील शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी आक्रमक होत आम्हाला बोलू द्या, मोरवाडीतील प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या अन्यथा सभात्याग करू, असा इशारा दिला. परंतु महापौरांनी राष्टÑगीत सुरू करून कामकाज संपवले त्यामुळे नाराज महिला नगरसेवकांनी सभागृहाबाहेर फलक फडकावून घोषणाबाजी केली.कालिका मंदिराच्या पाठीमागील सहवासनगर झोपडपट्टीतील सुमारे अडीचशे झोपड्या हटविण्यासाठी संबंधिताना नोटिसा देणाºया अधिकाºयांची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. हेमलता पाटील आणि शिवाजी गांगुर्डे यांनी केली. सदरची झोपडपट्टी हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दीड वर्षांपूर्वीच प्रशासनाला कळविले होते, मात्र हे आदेश जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आले. त्यातच सदरची झोपडपट्टी अधिकृत घोषित असून, मनपाने तेथे वाम्बी योजना राबवल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक