शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’स्टाइल आंदोलन

By admin | Updated: September 16, 2014 00:30 IST

पाण्यासाठी नगरसेवकाचे ‘शोले’स्टाइल आंदोलन

 

पंचवटी : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक गणेश चव्हाण यांनी प्रभागातील नागरिकांसह प्रभातनगर येथील मनपा जलकुंभावर चढून अनोखे आंदोलन केले. नगरसेवक चव्हाण यांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन सुरू केल्याचे समजताच मनपाच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क साधून येत्या दोन ते तीन दिवसांत परिसरातील पाणीप्रश्न मार्गी लावणार असल्याबाबत सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. म्हसरूळ शिवारातील प्रभातनगर या भागातील नागरिकांसाठी मनपाने ३० वर्षांपूर्वी जलकुंभ उभारलेला आहे. सध्या या जलकुंभातून म्हसरूळ तसेच म्हसरूळ गावठाण, मखमलाबाद परिसर, कलानगर, दिंडोरीरोड, दत्तनगर, जुईनगर आदि भागांत पाणीपुरवठा केला जातो. सध्या पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. गंगापूर धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्यानंतर प्रशासनाने दोन वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. तरीही या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. त्यातच पाणीपुरवठा व वितरण विभाग यांच्यात समन्वय नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून परिसरातील नागरिकांसह हे आंदोलन छेडण्यात आले. (वार्ताहर)