coronavirus: Sent back to 500 passengers arriving illegally by train | coronavirus : रेल्वेतून बेकायदा इगतपुरीत आलेल्या 500 प्रवाशांना परत पाठवले

coronavirus : रेल्वेतून बेकायदा इगतपुरीत आलेल्या 500 प्रवाशांना परत पाठवले

नाशिक-  रेल्वेने सोडलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीर रित्या शिरलेल्या सुमारे 500 प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले असून, त्यांना जिल्हा प्रशासनाने परत पाठवले आहे. हे सर्व उत्तर भारतीय आहेत.
इगतपुरी येथे रेल्वेने काही नागरिक उतरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली.

रेल्वेने त्यांच्या मेंटेनन्स स्टाफसाठी एक गाडी सोडली होती, ज्यातून जवळपास 400 ते 500 अनधिकृत प्रवासी देखील प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेश येथे जाणार होती या सर्व प्रवाशांना रेल्वेने इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे खाली उत्तर उतरवले. त्यानंतर हे सर्व प्रवासी शहरांमध्ये प्रवेश करणार होते. मात्र जिल्हा प्रशासनाने या सर्व प्रवाशांना पुन्हा रेल्वे स्टेशन मध्ये परत पाठवून दिले व त्यांना त्या गाडीत बसून पुढे जाण्यास सांगितले.  

सध्या तलाठी पोलीस कर्मचारी ग्रामसेवक इत्यादी शासकीय कर्मचारी स्टेशन परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लवकरच पुरवण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: Sent back to 500 passengers arriving illegally by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.