शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

रिसर्च टीम शोधणार 'मालेगाव मॅजिक', चार महाविद्यालयांतील ३५ तज्ज्ञांची टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 13:36 IST

CoronaVirus : एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडविणारे ठरले. मात्र, आता हेच संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे.

नाशिक : राज्यात सर्वत्र गुणाकार पद्धतीने रुग्णसंख्या वाढत असताना मालेगावात सक्रिय रुग्णांची संख्या अवघी ६५ आहे. त्यामुळे मालेगावच्या कोरोना मुक्तीचे रहस्य नेमके काय हा प्रश्न उपस्थित होत असून, हे गूढ उकलण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ६० समन्वयकांसह सुमारे ३५ तज्ज्ञ संशोधकांचे पथक नियुक्त केले आहे. 

या पथकाची पहिली बैठक मंगळवारी (दि. १२) मालेगावला पार पडली असून, रिसर्च टीममधील तज्ज्ञांकडून मालेगावातील सुमारे अडीच हजार नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्याचे कारण मालेगाव काढा, अर्सेनिक अल्बम व जीवनशैलीचा एकत्रित अभ्यास करणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

एक ना अनेक समस्यांनी घेरलेले मालेगाव कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्य सरकारची झोप उडविणारे ठरले. मात्र, आता हेच संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. राज्यभरात रुग्ण संख्येचे आकडे हजारांनी वाढत असताना मालेगावमध्ये मात्र बोटावर मोजण्याएवढेच रुग्ण आढळत आहेत. 

सरकारी नियमांचे सर्रास उल्लंघन होणाऱ्या मालेगावमध्ये रुग्ण संख्या वाढत नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटत असून, त्यामुळेच राज्य सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मालेगावचा अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लष्करी जवानांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या निवृत्त लेफ्टनंट जनरल तथा कुलगुरू डॉ. माधुरी कानीटकर यांच्या नेतृत्वात हा संशोधनात्मक अभ्यास तयार करून यासंदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. या संशोधन अहवालाकडे कोरोनामुक्तीची आस लावून बसलेल्या संपूर्ण देशातील आरोग्य व्यवस्थेचे लक्ष लागलेले आहे.

चार महाविद्यालयांतील ३५ तज्ज्ञांची टीममालेगावमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमधील होमिओपॅथी, आयुर्वेद महाविद्यालयांसह मालेगावमधील दोन युनानी व धुळे वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे ३५ तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली असून, या टीमच्या माध्यमातून मालेगावममधील अडीच हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहे. तसेच त्यांचा दिनक्रम, खाण्या-पिण्याच्या सवयी, कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली जाणार आहे. त्याच्या एकत्रित अभ्यासातून कोरोनाचे प्रमाण घटण्याची कारणे शोधली जाणार असून, या मोहिमेचे मालेगाव मॅजिक असे नामकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनMalegaonमालेगांवNashikनाशिक