शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

Coronavirus: आता नाशिकमध्येही मास्क वापरणे सक्तीचे; विश्वास नांगरे पाटलांनी जारी केला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 15:19 IST

 कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असताना आता मुंबई-पुणे पाठवत नाशिकमध्येही रुग्ण वाढतांना दिसून येत आहे.

नाशिक: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला आहे. कोरोनाचा प्रसार देशासह राज्यात व आता नाशिक शहरातसुद्धा वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी प्ररिबांधात्मक उपाय म्हणून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मास्क वापरणे नागरिकांना सक्तीचे केले आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतंत्रपणे अधिसूचना गुरुवारी जारी केली.

 कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असताना आता मुंबई-पुणे पाठवत नाशिकमध्येही रुग्ण वाढतांना दिसून येत आहे. नाशिक शहरात एक कोरोनाबाधित तर जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्ण या चार दिवसांमध्ये आढळून आले आहेत. यापैकी मालेगावमध्ये आढळलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूही झाल्या आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली असून नाशिक शहर व जिल्ह्यात कोरणा आजाराला अटकाव करण्यासाठी बंदोबस्त कडक करण्यात आला असून संचारबंदी देखील अधिक प्रभावी पोलिसांकडून केली जात आहे. विनाकारण रस्त्यावर संचार करणार नाहीत याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे.

मुंबई पुणे पाठव नाशिकमध्येही नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात यात आले आहे जेणेकरून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखता येणे शक्य होईल असे प्रशासनाने म्हटले आहे. यासंदर्भात नांगरे-पाटील यांनी सात्र प्रतिबंधक कायदा 1897 फक्त नुसार शहरात नागरिकांनी मास्कचा वापर करावा अशी अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदी तसेच भारतीय दंड संहिता कलम 1988 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

 नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील लोकसंख्येची घनता अतिशय दाट असल्याने कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्यासाठी पोषक स्थिती उपलब्ध आहे. सद्यस्थितीत शहरात कोरोना विषाणुच्या संसर्गाची लक्षणे आढळून येत असलेल्या संशयित रुग्ण मोठया संख्येने उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल होत आहेत. त्याच वेळेला वैद्यकीय तपासणीअंती कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या रूणांची संख्याहो वाढत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कोरोना विषाणुच्या प्रसाराच्या या टप्यात कोरोना विषाणुचा संसर्ग कित्येक पटीने वाढून नाशिक शहरातील लोकसंख्या बाधीत होऊ शकते. कोरोना विषाणुच्या या वाढत्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित सामासिक अंतर ठेवणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच कलम 144नुसार लोकांच्या संचारास मनाईदेखील करण्यात आली आहे. 

शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधीत नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. तसेच असे मास्क मानांकित प्रतिचे अथवा घरगुती पध्दतीने तयार केलेले व योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जतुक करून पुन्हा वापरता येण्याजोगे असेल याची खात्री बाळगावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील