CoronaVirus News : बापरे! सलग दुसऱ्या दिवशी ५००हून अधिक कोरोना रुग्ण; 'या' जिल्ह्याने वाढवली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:14 IST2022-01-07T15:58:40+5:302022-01-07T16:14:38+5:30
नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ५००हून अधिक आली असून, आज एकूण ५३८ आली आहे. जिल्हा प्रशासनासह ...

CoronaVirus News : बापरे! सलग दुसऱ्या दिवशी ५००हून अधिक कोरोना रुग्ण; 'या' जिल्ह्याने वाढवली चिंता
नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ५००हून अधिक आली असून, आज एकूण ५३८ आली आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी (दि. ६) पुन्हा बाधित संख्येत वाढ मोठी असली तरी शहरातील बळींची संख्या दोन असल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ८७६३वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असला तरी त्यातही समाधानाची बाब म्हणजे बळींच्या संख्येत अद्याप तरी वाढ झालेली नाही. मात्र, दररोजच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्येतही १८६७ इतकी वाढ झाली आहे. त्यातही १४६७ नाशिक मनपा, ३३२ नाशिक ग्रामीण, १८ मालेगाव मनपा आणि ६० जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे, तर जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढीमुळे प्रलंबित अहवालांची संख्यादेखील २२३० वर गेली आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवालांमध्ये नाशिक ग्रामीणला १६१९, नाशिक मनपा ४४४, तर मालेगाव मनपाचे १६७ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना मुक्ततेचे प्रमाण ९७.४४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यात नाशिक मनपात ९७.६६, नाशिक ग्रामीण ९७.११, मालेगाव मनपा ९७.०५, जिल्हाबाह्य ९६.९८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पॉझिटिव्हिटी रेट ११.०८
जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ११.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. बुधवारी असलेल्या १०.३१ टक्के दरात ०.७७ टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्राचा वेग सर्वाधिक असून, त्याखालोखाल नाशिक तालुक्यात ५१ बाधित, दिंडोरीत ५७, निफाडला ६४, देवळा १२, सिन्नर ३१, बागलाण १० तर अन्य तालुक्यांमध्ये एका आकड्यात रुग्णसंख्या वाढ झाली आहे.