ब्रह्मगिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:10 IST2020-07-15T21:49:14+5:302020-07-16T00:10:35+5:30
त्र्यंबकेश्वर : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ब्रह्गिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट आहे. येत्या मंगळवारपासून (दि.२१) श्रावणमास सुरू होत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी होणारा परिक्र मेच्या वाटेवर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होत असते. ही प्रदक्षिणा साक्षात महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाला केली जाते. आबालवृद्ध उत्साहाने प्रदक्षिणा करतात.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट
त्र्यंबकेश्वर : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ब्रह्गिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट आहे. येत्या मंगळवारपासून (दि.२१) श्रावणमास सुरू होत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी होणारा परिक्र मेच्या वाटेवर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होत असते. ही प्रदक्षिणा साक्षात महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाला केली जाते. आबालवृद्ध उत्साहाने प्रदक्षिणा करतात.
तिसºया श्रावण सोमवारी तर जणू सिंहस्थातील शाही पर्वणी भरत असते. जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला तिसरा श्रावणी सोमवार नियोजनासाठी दोन ते तीन बैठकाही घ्याव्या लागतात. यावरून संपूर्ण श्रावण महिना व तिसºया सोमवारी त्र्यंबकेश्वरला
किती गर्दी होत असते याची कल्पना येते. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मुळात श्रावण महिन्यात नेहमीप्रमाणे जल्लोष होईल, असे चित्र आज तरी दिसत नाही. हिंदु धर्मात श्रावण महिना व्रतवैकल्याचा उपासतापासांचा असतो आणि
विशेष म्हणजे भगवान शंकराचा उपासनेचा महिना असतो. त्र्यंबकेश्वरला येणारे दरवर्षी कोट्यवधी शिवभक्त येत असतात.
-------------------
व्यावसायिकांची उपासमार
पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर परिसरातील सृष्टी सौंदर्य बहरते. डोंगरावरून वाहणारे धबधबे, नदीनाले भरभरून वाहतात. निसर्गरम्य वातावरण, रिमझिम पाऊस, सर्वत्र हिरवाई पसरलेली झाडे-वृक्षवेली, रानफुले आदींनी निसर्गराजाला बहर आला असतो. अंजनेरी, पहिने, दुगारवाडी धबधबा त्र्यंबकेश्वरसह अंबोली घाट, अंबोली परिसरातील धुके यांचा हा विलोभनीय नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो. श्रावण महिन्यात येणारे भाविक तर येतातच; पण असंख्य निसर्गप्रेमी येत असतात. गडकिल्ले, पहाडावरचे ट्रेकिंग करण्यासाठी काही हौशी ट्रेकर्स येत असतात. त्र्यंबकेश्वरला गेल्या पंधरा दिवसांपासुन ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी २१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ११ रु ग्ण पॉझििटव्ह असुन विविध रु ग्णालयात उपचार घेत आहेत. अशा या पाशर््वभूमीवर गावात मंदीर बंद आहे. स्नानासाठी कुशावर्त बंद आहे. बस प्रवासी टॅक्सी बंद आहेत. मुख्य मंदीर बंदमुळे शहराची अर्थ व्यवस्था ढासळली आहे.अनेक व्यावसायिक मजुर आदींची उपासमार होत आहे.