नाशकात कोरोनाचा कहर सुरूच ; मंगळवारी आणखी आठ बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 08:02 PM2020-06-23T20:02:37+5:302020-06-23T20:06:50+5:30

नाशिक शहरात कोरोना बळींची संख्या थांबत नसून गेल्या मंगळवारी (दि.२३) आठ जणांचे बळी कोरोनामुळेच झाल्याची नोंद महापालिकेत झाली. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ७६ झाली आहे. 

Corona's havoc continues in Nashik; Eight more victims on Tuesday | नाशकात कोरोनाचा कहर सुरूच ; मंगळवारी आणखी आठ बळी 

नाशकात कोरोनाचा कहर सुरूच ; मंगळवारी आणखी आठ बळी 

Next
ठळक मुद्देनाशकात कोरोनाबळींच्या संख्येत वाढ शहरात मंगळवारी 8 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

नाशिक : शहरात कोरोना बळींची संख्या थांबत नसून गेल्या मंगळवारी (दि.२३) आठ जणांचे बळी कोरोनामुळेच झाल्याची नोंद महापालिकेत झाली. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ७६ झाली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवस शहरात सलग सहा आणि मंगळवारचे आठ असे तीन दिवसांत वीस जणांचा मृत्यू झाला आहे. 
 शहरात कोरोनाबाधितांबरोबरच मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. शहरातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दाट लोकवस्तीत आढळत असून, याच भागातील मृतांची संख्या अधिक आहे. शहरातील पंचवटी, जुने नाशिक आणि वडाळा या भागातील मृतांची अधिक आहे. मंगळवारीदेखील विविध भागांतील आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, तर सायंकाळ पर्यंत बारा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने रुग्ण संख्या बाराशे पार गेली आहे. शहरात कोरोनाबळींची संख्या कायम असून, सोमवारीही (दि.२२) सहाजण दगावल्याची नोंद झाली होती.  त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या सातत्याने वाढत असून बाधितांच्या संख्येतही वाढ होत दिसून येत आहे.  दरम्यान, महापालिकेने मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्णांना प्राथमिक लक्षणे असतानाच उपचार करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. दाट लोकवस्ती भागात सुमारे शंभर रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.  शहरात बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मृत्यूची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहेत. रविवारी (दि.२१) एकाच दिवशी जुन्या नाशकातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. सोमवारी (दि.२२) पुन्हा सहा जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. शहरात बाधितांची संख्या वाढत असून, ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, रुग्णसंख्येपेक्षा मृत्यूदर रोखण्याची गरज आहे, त्यादृष्टीने आता मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या कोविड सेलप्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी दिली. 

Web Title: Corona's havoc continues in Nashik; Eight more victims on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.