शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

मालेगावमध्ये कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 12:33 AM

मुंबई-पुणे पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत चालले असून गुरुवारी (दि.८) मालेगाव येथील एकाचा कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. याशिवाय, मालेगाव शहरातीलच अन्य चार संशयितांच्या स्वॉबचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. बळी गेलेला रुग्ण हा महिनाभरापूर्वीच सौदीवरुन आल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देजिल्ह्यात बाधितांची संख्या सहा : विशेष कक्षात उपचार सुरू; जिल्हा प्रशासन धास्तावले, आरोग्य यंत्रणा अलर्ट

नाशिक : मुंबई-पुणे पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचे संकट अधिक गहिरे होत चालले असून गुरुवारी (दि.८) मालेगाव येथील एकाचा कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. याशिवाय, मालेगाव शहरातीलच अन्य चार संशयितांच्या स्वॉबचे नमुने पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. बळी गेलेला रुग्ण हा महिनाभरापूर्वीच सौदीवरुन आल्याचे सांगितले जाते.मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत ६७ संशयितांच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच एका कोरोना संशयिताचा बुधवारी (दि.८) सकाळी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. त्याचा दफनविधी पार पडल्यानंतर सायंकाळी त्याच्या स्वॉबच्या नमुन्याचा पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने पहिला बळी गेला आहे. याशिवाय, अन्य सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अन्य चार संशयितांचेही नमुने पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पुरती हादरली आहे. नाशिक जिल्ह्णात मंगळवारपर्यंत कोरोना बाधितांची संख्या दोन होती. त्यात आता मालेगावमधील चौघांची भर पडली आहे.सौदीत आला होता जाऊनमालेगाव येथील बळी गेलेला रुग्ण हा महिनाभरापूर्वीच सौदी येथे जाऊन आलेला होता. मालेगावी परतल्यानंतर त्याने आपल्या प्रवासाची माहिती दडवून ठेवली होती. प्रकृती अधिक खालावल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच तो रुग्णालयात दाखल झाला होता. जिल्ह्यात कोरोनाने पहिला बळी घेतल्याने आरोग्य यंत्रणा कमालीची सतर्क झाली असून पोलिसांनीही मालेगावची नाकाबंदी केली आहे. संचार बंदीचे कोणत्याही प्रकारे उल्लघंन होऊ नये म्हणून गुरुवारी (दि. ९) मालेगावी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.नवीन २२ संशयित दाखलजिल्ह्यातून आतापर्यंत ३१७ संशयिंत रुग्णांच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २४३ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असून २७ प्रलंबित आहेत. बुधवारी नवीन २२ संशयित समोर आले आहेत.मनमाडला होम क्वॉरण्टाइनची यादी व्हायरलमनमाडमध्ये होम क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या नागरिकांच्या नावाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून, दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. काही नागरिक लॉकडाउन लागू होण्याअगोदर १० ते १५ दिवस आधी नातेवाइकांकडून घरी अथवा मूळगावी परत आलेले आहेत. अशांनी रुग्णालयात तपासणी करून घेतल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.च्मनमाडला कोणीही कोरोनाबाधित नाही. केवळ सुरक्षिततेचा उपाय म्हणून सार्वजनिक हितासाठी काही व्यक्तींना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यांच्यापासून कुणालाही धोका नाही. अशा लोकांच्या नावांची यादी व्हायरल करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वासठेवू नये. अशा अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा असून, सायबर अ‍ॅक्टनुसार असे कृत्य करणाºयाचाशोध घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू