कोरोनाचा प्रादुर्भाव; तहसीलदरांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:56 IST2020-09-21T22:22:33+5:302020-09-22T00:56:37+5:30
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी माळेगाव, मुसळगाव एमआयडीतील उद्योगधंदे कमीतकमी आठवडाभर बंद करावे, आठवड्यातील दोन दिवस जनता कर्फ्यू घोषित करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव; तहसीलदरांना निवेदन
ठळक मुद्दे तालुक्यात रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी माळेगाव, मुसळगाव एमआयडीतील उद्योगधंदे कमीतकमी आठवडाभर बंद करावे, आठवड्यातील दोन दिवस जनता कर्फ्यू घोषित करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना संसर्गात वाढ होत असल्याने शहर व तालुक्यात रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. निवेदनावर सुभाष कुंभार, तालुकाध्यक्ष आनंदा सालमुठे, उत्तम बोडके, प्रभाकर चकोर, शशिकांत गर्जे, सुनील देशमुख, सुनील होळकर आदींची नावे आहेत.