रेल्वेस्थानकावर पुन्हा कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:07 AM2021-04-23T01:07:37+5:302021-04-23T01:08:04+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकात काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला प्रवाशांची कोरोना चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली असून, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी भेट देऊन लक्ष घातल्याने येथे कर्मचारी, साहित्य उपलब्ध झाले आहे. रेल्वे प्रवाशांच्या कोरोना रॅपिड टेस्ट दीड महिन्यापासून बंद होत्या.  

Corona inspection again at the train station | रेल्वेस्थानकावर पुन्हा कोरोना तपासणी

रेल्वेस्थानकावर पुन्हा कोरोना तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून होती बंद : महापालिकेने पुरविले बळ 

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला प्रवाशांची कोरोना चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली असून, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी भेट देऊन लक्ष घातल्याने येथे कर्मचारी, साहित्य उपलब्ध झाले आहे. रेल्वे प्रवाशांच्या कोरोना रॅपिड टेस्ट दीड महिन्यापासून बंद होत्या.    गेल्या दोन दिवसांत येथे चार प्रवासी कोरोनाबाधित आढळले. रेल्वेच्या कोरोना कक्षात दोन टेक्निशयन आणि दोन कर्मचारी, अशी टीम तीन पाळ्यांत काम करत आहे. दिल्ली आणि हरयाणाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्रामुख्याने चाचणी केली जात आहे. पंचवटी एक्स्प्रेसने येणारे प्रवासी चाचणीस नकार देत आहेत. प्रवाशांकडे निगेटिव्हचा रिपोर्ट असेल, तर त्याला सोडले जाते. रिपोर्टचा ७२ तासांचा कालावधी संपलेला असेल किंवा चाचणीच केलेली नसेल, त्यांची रॅपिड टेस्ट केली जाते.    महापालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने रेल्वेस्थानकातील कोरोना तपासणी कक्षालाच टाळे ठोकण्यात आले होते. नाशिक रोड रेल्वेस्थानकात देशभरातून हजारो प्रवासी येतात. सध्या फक्त स्पेशल ट्रेन सुरू असूनही रोज दोन हजारांवर प्रवासी रोज येतात. त्यांच्या थर्मल स्क्रीनिंग, कोरोना टेस्टसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाला आहे. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी झाल्यामुळे कक्षात फक्त तापमान नोंद होते. रेल्वेचे भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता  म्हणाले की, प्रवासी वाहतूक हे रेल्वेचे मुख्य काम आहे. प्रवाशांच्या कोरोना टेस्टची जबाबदारी राज्य सरकारची आहे. 
प्रवाशांची संख्या वाढल्याने संसर्गाची भीती
नाशिक रोड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे करोना संसर्गाची भीतीही मोठी आहे. त्याचा फटका नाशिक रोड व शेजारी स्थानकांना बसला आहे.  वीसच्या वर रेल्वे कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी स्टेशनमास्तर आर.के. कुठार, वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडला सोळा टीसींना फेस शील्ड व काचेचे भिंग देण्यात आले आहेत. 

Web Title: Corona inspection again at the train station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.