नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.१४) एकूण ३८ नागरिक बाधित आढळले असून ६६ नागरिक कोरोनामु्क्त झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात रविवारी तब्बल एक महिन्यानंतरच्या कालावधीनंतर दिवसभरात एकाही कोरोनामृत्युची नोंद झाली नाही. दरम्यान सातत्याने कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण अधिक रहात असल्याने कोरोना उपचारार्थींची संख्या ४०० पर्यंत खाली आली आहे. तर कोरोना प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ७२ आहे. दरम्यान कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९७.७९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
जिल्ह्यात कोरोना मृत्यु शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 01:19 IST