शारदा मोटर्समधून कॉपर वायरची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2021 00:37 IST2021-11-05T00:37:02+5:302021-11-05T00:37:51+5:30

सातपूर औद्योगिक वसाहतीतील शारदा मोटर्स कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

Copper wire theft from Sharda Motors | शारदा मोटर्समधून कॉपर वायरची चाेरी

शारदा मोटर्समधून कॉपर वायरची चाेरी

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील शारदा मोटर्स कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.३) सातपूर औद्योगिक वसाहतीतील शारदा मोटर्स कंपनीतील मेंटेनन्स डिपार्टमेंटमधील ५० हजार रुपये किमतीची कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार अभिजीत दत्तात्रेय कुलथे रा.श्यामसुंदर अपार्टमेंट पाथर्डी फाटा यांनी दाखल केली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत चोरीच्या घटना वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी जैविक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत झालेल्या दीड लाखाच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तरीही चोरट्यांवर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही. पोलिसांना न जुमानता चोरटे कारखान्यात डल्ला मारत असल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Copper wire theft from Sharda Motors