दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रति आता मिळणार ई-मेलवर ; दोन दिवसांत होणार प्रक्रिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:06 PM2020-07-12T17:06:26+5:302020-07-12T17:09:34+5:30

दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाया उत्तरपत्रिका यावर्षी ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मेलद्वारे पाठविली जाणार आहे.

Copies of 10th, 12th answer sheets will now be available on e-mail; The process will take place in two days | दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रति आता मिळणार ई-मेलवर ; दोन दिवसांत होणार प्रक्रिया 

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रति आता मिळणार ई-मेलवर ; दोन दिवसांत होणार प्रक्रिया 

Next
ठळक मुद्देउत्तरपत्रिकांची स्कॅनप्रत ऑनलाइन मिळणारपुनर्मुल्यांकन प्रक्रिया होणार सोपीविद्यार्थ्यांना मेलसह व्हॉट्सऍपचाही पर्याय

नाशिक : दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाया उत्तरपत्रिका यावर्षी ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मेलद्वारे पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही ही प्रत पाठविण्याची तयारी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने दाखविली आहे. 
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्यानुसार त्यांच्या उत्तरपत्रिका मागितल्यास त्या उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर हजारो विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घेण्यासाठी अर्ज करतात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचा आॅनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर त्याचे पुनर्मूल्यांकन छायाप्रती साठीचे अर्ज घेणे, छायाप्रती देणे, याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तोडगा काढत राज्य शिक्षण मंडळाने यावर्षी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती ई-मेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.  दरवर्षी छायाप्रती वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनांचे निकाल लांबतात. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील प्रवेशप्रक्रियेवर होतो. त्यात यावर्षी परिस्थिती आणखी बिकट आहे. पुनर्मूल्यांकन अर्जाचे निकाल उशिरा मिळाल्यास विद्यार्थ्यांचे अधिकच नुकसान होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने अशाप्रकारे आॅनलाइन प्रत देण्याचा निर्णय घेतला असून, उत्तरपत्रिकेची मागणी करणाºया विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्कॅन करून पाठविण्यात येणार आहे. त्यासाठीचे अर्जही आॅनलाइन भरण्याचा पर्याय मंडळाने उपलब्ध करून दिला आहे. 

विद्यार्थ्यांच्या फेऱ्या वाचणार 
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या उत्तरपत्रिकांची स्कॅनप्रत आॅनलाइनद्वारे देण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याने ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाची छायांकित प्रत मिळवायची आहे. त्यांच्या विभागीय मंडळाच्या कार्यालयातील फेºया वाचणार आहे. नाशिक विभागात नाशिकसह नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील दहावीच्या १ लाख १६ हजार ४४४ व बारावीच्या १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 

Web Title: Copies of 10th, 12th answer sheets will now be available on e-mail; The process will take place in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.