शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कथित पोलीस मित्रांमुळे सुन्यासुन्या चौकांत होताहेत वादविवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 2:34 PM

डॉक्टर, परिचारिका, भाजीपाला विक्रेते, केमिस्ट, पत्रकार, दूधविक्रेते यांसारख्या घटकांनाही कथित पोलिस मित्रांच्या अतिउत्साह अन् रोष अंगावर ओढावून घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देकथित स्वयंसेवक थेट जाब विचारत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिकादेखील मोठ्या संख्येने घरातच कारवाईला माणुसकीचा चेहरा; मात्र....

नाशिक : ‘चहापेक्षा किटली गरम’ या उक्तीप्रमाणे ‘पोलिस मित्र’ सध्या शहरातील विविध चौकांमध्ये वावरताना दिसत आहेत. त्यांचा अतिउत्साह निरव शांततेत वादाला तोंड देणारा ठरू लागला आहे. पोलीस मित्रांमुळे बंदोबस्ताचा ताण काहीसा हलका होईल, असे अस्सल पोलिसांना वाटत होते, मात्र त्यांची डोकेदुखीच अधिक वाढल्याचे चित्र शहरातील सुन्या-सुन्या चौकांमध्ये दिसत आहेत.शहर व परिसरात कुठल्याहीप्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात आलेली नाही. संचारबंदी केवळ मानवी आरोग्याच्या सुरक्षेसाठी लावण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत रहावी, यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट होणारे डॉक्टर, परिचारिका, भाजीपाला विक्रेते, केमिस्ट, पत्रकार, दूधविक्रेते यांसारख्या घटकांनाही कथित पोलिस मित्रांच्या अतिउत्साह अन् रोष अंगावर ओढावून घ्यावा लागत आहे. बंदोबस्तावरील पोलिसांच्या हाती काठी नसेल मात्र या कथित स्वयंसेवकांच्या हातात काठी दिसते. दुचाकीस्वारांच्या अंगावर हे कथित स्वयंसेवक थेट धावून जात त्यांना जाब विचारत आहेत. कोरोनामुळे नागरिकांनी घरात थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. नागरिकांकडूनदेखील या आवाहनाला साद घातली जात आहे; मात्र काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना दुचाकीचा वापर करण्याशिवाय दुसरा गत्यंतर नाही; मात्र ही बाब कथित स्वयंसेवकांच्या लक्षात येत नाही, किंबहुना काही नाकाबंदी पॉइंटवर तर हे कथित पोलीस मित्र तेथील बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंदोबस्ताचा ताण अन् या पोलीस मित्रांच्या वादामुळे वाढणारी डोकेदुखी असा दुहेरी त्रास अस्सल पोलिसांना होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.कारवाईला माणुसकीचा चेहरा; मात्र....शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अद्यापही नागरिकांवर कारवाई करताना माणुसकीचा चेहरा दिसत आहे. कारवाईदरम्यान, कुठल्याहीप्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जात आहे; मात्र ‘पोलीस मित्र’ म्हणून ज्यांना मदतीला पोलिसांनी घेतले आहे, त्या मंडळींमुळे पोलीस कारवाईचा माणुसकीचा चेहरा मलीन होताना दिसत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकादेखील मोठ्या संख्येने घरातच थांबले आहेत; काहींचा अपवाद वगळता जे लोक वाहनांनी बाहेर पडत आहेत, ते केवळ अत्यावश्यक सेवेतील घटक आहेत, मात्र याकडे कथिक पोलीस मित्र दुर्लक्ष करत आपला ‘रुबाब’ गाजवित आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस