येवल्यात दुषित पाणी; काँग्रेसचे पालिकेला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:40 PM2020-12-23T13:40:49+5:302020-12-23T13:41:08+5:30

येवला : शहरातील जुनी नगरपालिका रोड, न्हावी गल्ली, जुना परदेशपुरा परिसरात नळांद्वारे दुषित पाणी येत असल्याची तक्रार शहर युवक काँग्रेसने पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

Contaminated water in Yeola; Congress statement to the municipality | येवल्यात दुषित पाणी; काँग्रेसचे पालिकेला निवेदन

येवल्यात दुषित पाणी; काँग्रेसचे पालिकेला निवेदन

Next

येवला : शहरातील जुनी नगरपालिका रोड, न्हावी गल्ली, जुना परदेशपुरा परिसरात नळांद्वारे दुषित पाणी येत असल्याची तक्रार शहर युवक काँग्रेसने पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत मुख्य लिपीक बापूसाहेब मांडवडकर यांना शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगलसिंग परदेशी यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. गेल्या पाच महिन्यांपासून जुनी नगरपालिका रोड, न्हावी गल्ली, जुना परदेशपुरा परिसरात नळांद्वारे प्रारंभी दूषीत पाणी येत आहे. यापूर्वी निवेदन दिले मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही. बुधवारी, (दि. २३) सकाळी चार वाजता येणारे पाणी दहा वाजता आले तर पाणी अतिशय गढूळ, दूषीत पाणी आले. असे सदर निवेदनात म्हटले आहे.  या पाण्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने लक्ष घालून स्वच्छ व शुध्द पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी सदर निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.  निवेदनावर मंगलसिंग परदेशी, अशोक परदेशी, गोरख जाधव, गोकुळ परदेशी, अनिकेत जाधव, प्रतिक राऊत, वैभव जाधव, पंकज पांढरे, सागर परदेशी, राहुल सुवालका, मंगेश जाधव, तकदीर परदेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Contaminated water in Yeola; Congress statement to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक