नवीन कसारा घाटात कंटेनर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:16 IST2019-01-19T01:15:53+5:302019-01-19T01:16:20+5:30
नवीन कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर कंटेनर पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे.

नवीन कसारा घाटात कंटेनर उलटला
इगतपुरी : नवीन कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर कंटेनर पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे.
शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास नवीन कसारा घाटात कंटेनर (क्र . एमएच ०४ एचवाय ६९६७) हा मुंबईच्या दिशेने घाट उतरत असताना चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. त्यात चालक गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती पीक इन्फ्राचे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी रवि देहाडे, विठोबा भागडे, अनिल ठाकूर यांना मिळताच त्यांनी रु ग्णवाहिकेला पाचारण करत जखमी चालक याला इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. अधिक तपास घोटी टॅबचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.