कंटेनरची दुचाकीला धडक, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:54 AM2021-04-24T00:54:58+5:302021-04-24T00:56:13+5:30

मालेगाव तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जखमी झाले. 

The container hit the two-wheeler, injuring two | कंटेनरची दुचाकीला धडक, दोन जखमी

कंटेनरची दुचाकीला धडक, दोन जखमी

Next

मालेगाव : तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जखमी झाले. 
देवराम गंगाराम ब्राम्हणे (२५) रा. नांडियावड, पोस्ट मोयदा, जि. बडवानी, मध्य प्रदेश यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी कंटेनर (क्रमांक एचआर ३८- यू ३४७४) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  संंशयिताने त्याच्या ताब्यातील कंटेनर मालेगावकडून   धुळेकडे भरधाव वेगात नेत असताना दुचाकी (क्रमांक  एमएच १८-बीएन ५७३७) ला कट मारला. यात दुचाकीस्वार देवराम गंगाराम ब्राम्हणे (२५) व त्याच्यापाठीमागे बसलेला कवलसिंग फोरा पावरा मुखेड, ता. शिरपूर, जि. धुळे गंभीर जखमी झाले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.
दोन दुचाकींच्या धडकेत 
दोन जखमी
मालेगाव तालुक्यातील पाटणे शिवारात दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जखमी झाले. तालुका पोलिसांत दुचाकी (एमएच ४१ बीए ४३८८)वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र राजेंद्र खैरनार (२९, रा,. पाटणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. युनिकॉर्न दुचाकीवरील चालकाने पाटणे शिवारात समोरून येणारी दुचाकी (एमएच ४१ एपी ६१९०)ला धडक दिली. यात फिर्यादीसह पंकज देवाजी खैरनार गंभीर जखमी झाले. दोघांना जखमी करून अपघाताची खबर न देता पळून गेला.

Web Title: The container hit the two-wheeler, injuring two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.