तीन महिन्यांच्या वीजबिलाने दिंडोरी तालुक्यातील ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:09 IST2020-07-10T20:40:06+5:302020-07-11T00:09:22+5:30
दिंडोरी : वीज वितरण कंपनीने १ एप्रिलपासून दर वाढवत व लॉकडाऊनमुळे तीन महिन्याचे एकत्र बिल आकारणी होत असल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ झाल्याने तालुक्यातील ग्राहकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळात वीज मंडळाने दिलेल्या दरवाढीच्या ‘शॉक’ने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

तीन महिन्यांच्या वीजबिलाने दिंडोरी तालुक्यातील ग्राहक त्रस्त
दिंडोरी : वीज वितरण कंपनीने १ एप्रिलपासून दर वाढवत व लॉकडाऊनमुळे तीन महिन्याचे एकत्र बिल आकारणी होत असल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ झाल्याने तालुक्यातील ग्राहकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळात वीज मंडळाने दिलेल्या दरवाढीच्या ‘शॉक’ने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
वीज दर नियामक मंडळाने एक एप्रिल २०२० पासून विजेचे दर वाढवले आहेत. स्थिर आकारामध्ये १० रुपये वाढ करीत तो १०० रुपये केला आहे तर १०० युनिटपर्यंत ४१ पैसे, १०० ते ३०० युनिटपर्यंत ४८ पैसे व ३०० ते ५०० युनिटपर्यंत ४२ पैसे अशी दरवाढ केली आहे.
युनिटमध्ये ही किरकोळ वाढ दिसत असली तरी वीज आकार, त्यावरील इंधन समायोजन आकार, वीज आकार, इंधन वहन आकार, वीज शुल्क आदीमध्येही त्या प्रमाणात वाढ झाल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ झाली आहे.
-----------------
दरवाढीचा भुर्दंड
लॉकडाऊनमुळे नागरिक घरीच असल्याने विजेचा अधिक वापर झाल्याने बिलांचा आकडा मोठा वाढला आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात आलेल्या वीज बिलांमुळे ग्राहक वीज मंडळाच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत मात्र तेथे जास्तीची वीज वापरली त्याचा हा भुर्दंड असल्याचे सांगत वेळीच बिल भरा नाहीतर कनेक्शन कट होईल असा इशारा दिला जात आहे. मुळात उद्योग व्यवसाय बंद असताना शासनाने वीज बिल माफ करण्याऐवजी दरवाढीचा झटका दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.