महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर ग्राहकांचा पक्षपाती पणाचा आरोप-जनसुनावणीत गोंधळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:59 IST2018-08-13T16:53:10+5:302018-08-13T16:59:19+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे वीज ग्राहकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत आयोगने पक्षपात केल्याचा आरोप करीत असून उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व रहिवासी ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा आरोप अंबज, सातपूरसह मालेगावच्या  उद्योजकांनी केला आहे वीज कंपन्यांनी भरमसाठ केलेली दरवाढ निंदनीय असल्याचेही अनेक उद्योजकांनी म्हटले आहे.

Consumers' allegations of discrimination in Maharashtra Electricity Regulatory Commission; | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर ग्राहकांचा पक्षपाती पणाचा आरोप-जनसुनावणीत गोंधळ 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर ग्राहकांचा पक्षपाती पणाचा आरोप-जनसुनावणीत गोंधळ 

ठळक मुद्दे विद्युत नियमाक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोउद्योजक, शेतकरी ग्राहकांचा सुनावणीवर बहिष्कार पावर पाऊंट प्रझेंटेशन करण्यास मनाईमुळे गोंधळ

नाशिक  : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे वीजग्राहकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत आयोगने पक्षपात केल्याचा आरोप करीत असून उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व रहिवासी ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा आरोप अंबज, सातपूरसह मालेगावच्या  उद्योजकांनी केला आहे वीज कंपन्यांनी भरमसाठ केलेली दरवाढ निंदनीय असल्याचेही अनेक उद्योजकांनी म्हटले आहे. जनसुनावणीला सुरुवात झाल्यानंतर विद्युत नियामक आयोगासमोर विद्युत कंपन्यांकडून एक प्रेझेन्टेशन सादर करण्यात आले. त्यानंतर ग्राहकांची बाजू मांडताना चौख्या क्रमांकावर बोलण्यासाठी आलेले सतीश शाह यांनीही आयोगाकडे पावर पॉईंट प्रझेंटेशन सादर करण्याची परवानगी मागीतली.परंतु आयोगाने परवानगी नाकारत मुंबईला प्रझेंटेशन सादर करण्याची सूचना केली. त्यामुळे सर्व ग्राहकांनी आयोगाच्या भूमिकेचा विरोध करीत आयोग पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप केला त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गोंधळाची परिस्थीत निमार्ण झाली. आयोगाच्या या भूमिकेने संतप्त झालेल्या आयमा आणि निमाच्या उद्योजकांनी अन्य ग्राहकांसह याठिकाणी गोंधळ घालत बैठकीवर बहिष्कार टाकला. नियोजन भवनाच्या बाहेर पडत आयोगाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. विजेचे दर वाढल्यामुळे कशाप्रकारे अडचणींना सामोरे जावे लागते आहे. ग्राहकांना कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याबाबत एक प्रेझेन्टेशन सादर करण्यात येणार होते. परंतु प्रेझेन्टेशन आमच्याकडे द्यावे, इथे दाखवू नये अशा भूमिकेवर आयोग ठाम राहत उद्योजकांना बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर काही उद्योजकांनी या बैठकीला हजर राहत सहभाग घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी झाल्यामुळे याठिकाणी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

Web Title: Consumers' allegations of discrimination in Maharashtra Electricity Regulatory Commission;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.