शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक न्यायालयांमध्ये साठ हजार प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: March 23, 2015 23:55 IST

ग्राहक न्यायालयांमध्ये साठ हजार प्रकरणे प्रलंबित

नाशिक : सर्वसामान्यांमध्ये ग्राहक हक्क व ग्राहक न्यायालयांबाबत अजूनही हवी तितकी जनजागृती झालेली नाही. ग्राहकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ग्राहक न्याय मंचाच्या सदस्यांचे मानधन, जागेचा प्रश्न यांसह विविध समस्या समोर आहेत़ तसेच आजमितीस राज्य ग्राहक आयोगाकडे दहा हजार, तर ग्राहक मंचाकडे पन्नास हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष आऱ सी़ चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़राज्य ग्राहक तक्र ार निवारण आयोगाच्या नाशिक परिक्र मा खंडपीठाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी ग्राहक न्यायालयाचे पूर्ण वेळ काम चालते, तर कोल्हापूर, पुणे, अमरावतीमध्ये आठ दिवस काम चालते़ राज्यातील सहावे परिक्रमा खंडपीठ नाशिकमध्ये सुरू झाले असून, महिन्यातून आठ दिवस या खंडपीठाचे काम चालणार आहे़ग्राहक न्यायालयापुढे येणाऱ्या तक्रारींमध्ये विमा कंपन्या, बँका, खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या, बांधकाम व्यावसायिक, वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणा, कुरिअर सेवा, पोस्ट आॅफिस यांची प्रकरणे मोठ्या संख्येने येतात़ ही न्यायालये आरोपीला तीन वर्षांपर्यंत शिक्षा व दहा रुपयांपर्यंत दंड करू शकते़ या न्यायालयाचे कामकाज इंग्रजीतून चालावे, यासाठी न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे़ मात्र नागरिकांना समजेल, अशा भाषेत न्यायालयाचे काम चालावे असे वैयक्तिक मत असल्याचे चव्हाण म्हणाले़सद्यस्थितीत राज्य ग्राहक आयोगापुढे ग्राहक मंच सदस्यांचे मानधन, न्यायालयासाठी जागा आदि प्रश्न समोर आहेत़ यासाठी आयोगाने शासनाकडे निधीची मागणीदेखील केली आहे़ या न्यायालयांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या, तसेच ई कोर्टसारखे अभिनव उपक्रम राबविल्यास या प्रकरणांचे जलद निकाल लागतील़ तसेच ग्राहक हक्काच्या जनजागृतीसाठी दुकान चालविण्याचा परवाना देतानाच संबंधित यंत्रणेने याबाबत नियमावली तयार करण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)