अर्ली द्राक्षांसाठी विमा लागू करण्याबाबत विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:07 IST2020-07-16T21:58:48+5:302020-07-17T00:07:03+5:30
सटाणा : अर्ली (पूर्वहंगामी) द्राक्षासाठी हवामान आधारित पीकविमा लागू करण्याबाबत शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्यासाठी निर्यातीचे धोरण निश्चित करण्यासाठी या आठवड्यात अपेडा आणि निर्यातदार यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

अर्ली द्राक्षांसाठी विमा लागू करण्याबाबत विचार
सटाणा : अर्ली (पूर्वहंगामी) द्राक्षासाठी हवामान आधारित पीकविमा लागू करण्याबाबत शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्यासाठी निर्यातीचे धोरण निश्चित करण्यासाठी या आठवड्यात अपेडा आणि निर्यातदार यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत बागलाणमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा समवेत बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. गेल्या तीन दिवसांपूर्वी भुसे बागलाण तालुक्याचा दौºयावर असताना बागलाण तालुक्यातील पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादकांनी कैफियत मांडली होती. याची दखल घेत कृषीचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली द्राक्ष बागायतदार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.
या बैठकीत कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त, फलोत्पादन संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव, तालुका कृषी अधिकारी, सटाणा, अपेडाचे अधिकारी, विपणन विभागाचे अधिकारी तसेच कृषिभूषण शेतकरी खंडेराव शेवाळे, शेतीनिष्ठ शेतकरी कृष्णा भामरे, तुषार कापडणीस, प्रकाश शेवाळे, नीलेश चव्हाण, जिभाऊ कापडणीस आदी प्रगतिशील द्राक्ष बागायतदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सदरच्या बैठकीस सहभागी झाले होते. बैठकीत शेतकऱ्यांनी केलेल्या विविध मागण्यांना भुसे व डवले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर मंत्रालयीन स्तरावर काम सुरू असल्याचे सूतोवाच केले.
शासनस्तरावर तोडगा काढणार
पूर्वहंगामी द्राक्षासाठी हवामान आधारित पीकविमा लागू करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी केली. सदर मागणीवर शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून, याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन कृषिमंत्री भुसे यांनी दिले. तसेच पूर्वहंगामी द्राक्ष निर्यातीबाबत पुढील धोरण ठरविण्यासाठी येत्या आठ दिवसात अपेडाचे अधिकारी निर्यातदार यांचे सोबत नव्याने बैठक घेण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या.