शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेत गोंधळात गोंधळ

By admin | Updated: March 3, 2017 01:57 IST

नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत महापालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने गेल्या चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड उडत आहे.

 नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत महापालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने गेल्या चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड उडत आहे. त्यातच शासन मान्यताप्राप्त ई-सेवा केंद्रांवर यापूर्वी अर्ज दाखल करणाऱ्या नागरिकांच्या अर्जांची पुनर्पडताळणी महापालिकेमार्फत केली जाणार असल्याने नेमका अर्ज कोठे करायचा, याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांचे सर्वेक्षण थेट जागेवर होणार असतानाही झोपडीधारक रांगेत उभे राहत असल्यानेही विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे.केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना नाशिक महापालिकेमार्फत राबविली जाणार आहे. त्यासाठी चार घटक निश्चित करण्यात आले असून, महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांत त्यासाठी अर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. पहिल्या घटकात झोपडपट्ट्यांचा ‘आहे तिथेच पुनर्विकास’ करण्याची योजना आहे. मात्र, त्यासाठी झोपडीधारकांचे सर्वेक्षण त्यांच्या घरी जाऊन केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेने खास एजन्सी नियुक्त केली आहे. त्यानुसार, पश्चिम विभागात सध्या सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. आतापर्यंत पश्चिम विभागातील १० झोपडपट्ट्यांचे मॅपिंग करण्यात आले असून, यानंतर त्याठिकाणी टॅबमार्फत लाभार्थ्यांची माहिती भरून घेतली जाणार आहे. या घटकात लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. झोपडीधारकांचे जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असले तरी गेल्या तीन-चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांसमोर झोपडपट्टीतील रहिवाशांचीच अधिक गर्दी होताना दिसून येत आहे. अन्य घटकांसाठी त्याठिकाणी अर्जासाठी नागरिकांची गर्दी तुरळक आहे. याचबरोबर नोव्हेंबर २०१६ पासून शहरातील शासन मान्य ई-सेवा केंद्रांवरही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. परंतु, आता महापालिकेनेही त्याची सुरुवात केल्याने यापूर्वी ई-सेवा केंद्रांवर भरलेले अर्ज वैध की अवैध याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाच्या विभागीय कार्यालयांमध्येच भरून घेणारे अर्ज वैध असल्याचे आणि ई-सेवा केंद्रात भरलेल्या अर्जांची मनपामार्फत पुनर्पडताळणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच या योजनेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती असून, महापालिकेने त्याबाबत पुरेशी जागृतीच केली नसल्यानेच हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)